भाजपला काय, शिवसेनेला काय मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला मुख्यमंत्रिपद आणि गृहखातं मिळणार आहे, तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं मिळेल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळेल. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रातही एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये भाजप महाराष्ट्रातला त्यांचा गटनेता निवडणार आहे. यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत.
advertisement
फडणवीस-अजितदादांचं हास्य, शिंदेच्या चेहऱ्यावर गांभीर्य, अमित शाहांसोबतच्या बैठकीचे Photo
भाजपने गटनेता निवडल्यानंतर 1 डिसेंबरला महायुतीची बैठक मुंबईमध्ये पार पडेल, यानंतर 2 डिसेंबरला शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. एकट्या भाजपला 132 तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला.
