फडणवीस-अजितदादांचं हास्य, शिंदेच्या चेहऱ्यावर गांभीर्य, अमित शाहांसोबतच्या बैठकीचे Photo
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा फैसला दिल्लीमध्ये होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू आहे.
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा फैसला दिल्लीमध्ये होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक सुरू आहे. या बैठकीचे पहिले फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हसू तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत आहे.
advertisement
शिंदेंचे अमित शाहांकडे 4 प्रस्ताव
शिवसेनेकडून अमित शाह यांच्याकडे 4 प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रस्ताव 1
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे ठेवणार असाल तर शिवसेनेकडे आधी असलेली खाती तशीच ठेवा
प्रस्ताव 2
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार नसाल तर शिवसेनेला त्यांच्या कोट्यापेक्षा अधिकची 5 महत्त्वाची खाती द्या
प्रस्ताव 3
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असतील तर गृहमंत्री अथवा अर्थमंत्री पद द्यावं.
advertisement

प्रस्ताव 4
शिवसेनेकडून अन्य कुणी उपमुख्यमंत्री होणार असेल तर त्यांना गृहमंत्री आणि अर्थमंत्री भाजपकडून देणार नसाल, तर इतर खाती वाढवून द्यावी. 4-5 खाती वाढवून द्यावी.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यासाठी तीनही पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. शाह यांच्या निवासस्थानी जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
November 28, 2024 11:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीस-अजितदादांचं हास्य, शिंदेच्या चेहऱ्यावर गांभीर्य, अमित शाहांसोबतच्या बैठकीचे Photo


