महायुतीने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल प्रश्न विचारला असता अमित शहांनी म्हटलं की, निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून हा निर्णय घेणार आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. तसंच शरद पवार यांना संधी देणार नाही असंही अमित शहांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांना नेमकी कशाची संधी देणार नाही हे मात्र अमित शहा स्पष्ट बोलले नाहीत. भाजप महायुतीला पाठिंबा देण्याची की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याची संधी हा प्रश्न अनुत्तरित आहे.
advertisement
Manoj Jarange : मनोज जरांगे पाडापाडीवरून नरमले आणि फडणवीसांवर घसरले, 'तुम्हाला गुडघ्यावर..'
शरद पवारांच्या पाठिंब्याबाबत अजितदादा काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुतीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांनी यावर भाष्य करताना म्हटले की, शरद पवारांच्या मनात काय आहे त्याचा थांगपत्ता कुणालाच लागू शकत नाही.
शरद पवारांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम
२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं होतं. तर त्याआधी २०१४ मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. तेव्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण बहुमत गाठता आलं नव्हतं. त्यावेळी शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळेच आता पुन्हा एकदा त्यांच्या पाठिंब्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
