TRENDING:

Share Market: शेअर बाजारात उलट-सुलट खेळ, एका तासात कमावले 16,00,00,00,000; कोण झाले श्रीमंत?

Last Updated:

Share Market: आजच्या चढ-उतारांनी भरलेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीची तेजी हरवून बसलेला बाजार शेवटच्या तासात सावरला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 16,000 कोटी रुपयांची वाढ झाली.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: भारतीय शेअर बाजार आजसप्टेंबर रोजी मोठ्या चढ-उतारांनंतर जवळपास सपाट पातळीवर बंद झाला. सुरुवातीची तेजी गमावल्यानंतर शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे बाजाराने स्वतःला सावरले. निफ्टी सुरुवातीला २४,८३२.३५ पर्यंत पोहोचला होता. पण दुपारच्या सत्रात नफावसुलीमुळे तो २४,६२१.६० या दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरला. मात्र शेवटच्या तासात झालेल्या खरेदीने बाजार पुन्हा सावरला आणि जवळपास सपाट बंद झाला.

advertisement

बाजाराची आजची स्थिती

दिवसअखेरीस सेन्सेक्स ७.२५ अंकांनी किंवा ०.०१ टक्क्यांनी घसरून ८०,७१०.७६ वर बंद झाला, तर निफ्टी ६.७० अंकांनी किंवा ०.०३ टक्क्यांनी वाढून २४,७४१ वर बंद झाला. साप्ताहिक आधारावर पाहिल्यास, बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये १.२ टक्क्यांची वाढ दिसून आली.

advertisement

क्षेत्रीय कामगिरी आणि गुंतवणूकदारांचा नफा

क्षेत्रीय कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास रिअल्टी, एफएमसीजी आणि आयटी इंडेक्समध्येटक्क्यांची घसरण झाली. तर ऑटो इंडेक्स १.३ टक्क्यांनी वाढला. मीडिया आणि मेटल इंडेक्सही ०.५ टक्क्यांच्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्सही सपाट बंद झाले.

advertisement

आज बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ४५१.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जे काल ४ सप्टेंबर रोजी ४५१.२८ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १६,००० कोटी रुपयांची वाढ झाली.

सर्वाधिक वाढ आणि घसरण झालेले शेअर्स

advertisement

सेन्सेक्समधील ३० पैकी १२ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) च्या शेअर्समध्ये २.३४ टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली. त्यापाठोपाठ मारुती सुझुकी, पॉवरग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि भारती एअरटेलचे शेअर्स ०.८४ ते १.७० टक्क्यांनी वाढले.

दुसरीकडे सेन्सेक्समधील १६ शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये आयटीसीचा शेअर २.०१ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोट्यात राहिला. तसेच एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये १.२९ ते १.५५ टक्क्यांची घसरण झाली.

तेजी-मंदीचा आढावा

आज बीएसईवर एकूण ४,२६० शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी २,१३४ शेअर्स वाढीसह बंद झाले. तर १,९५७ शेअर्समध्ये घसरण झाली. १६९ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. आज १३५ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर ६४ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला.

मराठी बातम्या/मनी/
Share Market: शेअर बाजारात उलट-सुलट खेळ, एका तासात कमावले 16,00,00,00,000; कोण झाले श्रीमंत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल