धाराशिव : मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे याचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, आणि वाशी तालुक्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेलं ज्वारीचे पीक पाण्याअभावी कोमेजून जातेय. कोमेजलेलं ज्वारीचे पीक पाहिलं की आपोआप दुष्काळाची जाणीव होतेय. त्यामुळे ज्वारीचे उत्पन्न घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे.
advertisement
दुष्काळाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती
सध्या ज्वारीचे पीक सध्या हुरड्याच्या अवस्थेत आहे म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र मराठवाड्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडलाय. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातही खरीप हंगामात नद्या, विहिरी कोरड्या ठाक होत्या आणि याचाच परिणाम आता ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय. सध्या ज्वारीचे पीक कणसातील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतु विहिरींना, नद्यांना आणि तलावांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारीला पाणी देता येत नाही किंबहुना दुष्काळाचा फटका थेट ज्वारीच्या उत्पादनावरती झालाय.
फायद्याची आहे ही शेती, शेतकऱ्याने फक्त दोनच महिन्यात कमावले लाखो रुपये
खरीप हंगामातील पिके ही शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळून देतात. परंतु यावर्षी अत्यल्प पावसाने खरीप हंगामालाही फटका बसला तर रब्बी हंगामात घेतले जाणाऱ्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना देखील दुष्काळाचा मोठा फटका बसलाय. उन्हाची धग वाढलीय जमिनीत ओलावा नाही त्यातच पिकांना देण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे एकूणच ज्वारीच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यताय.
उच्चशिक्षित तरुणाची कमाल! विदर्भात फुलवली जिरॅनियमची शेती; करतोय लाखोंची कमाई
ज्वारीला भाव द्यावा
10 एकर ज्वारी पेरणी केली परंतु काहीच होण्याची देखील शक्यता नाही. 10 एकर ज्वारी करण्यासाठी झालेला खर्च देखील निघतो का नाही? हा प्रश्न माझ्यासमोर आहे. यावर्षीचा दुष्काळामुळे ज्वारीच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे ज्वारीला 100 रुपये किलोचा भाव प्रशासनाने द्यावा अशी मागणी, ज्वारी उत्पादक शेतकरी दत्तात्रय गायकवाड यांनी केली आहे.