डोंबिवली : सध्या अनेक जण प्रायव्हेट जॉब पेक्षा व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. डोंबिवली शहरातली रहिवासी असणाऱ्या भक्ती पाटीलने नऊ वर्ष प्रायव्हेट जॉब केला. परंतु तिला प्रायव्हेट जॉबमध्ये रस नव्हता. शेवटी नऊ वर्षानंतर तिने मोमोजचा व्यवसाय करण्याचे धाडस केले. तेव्हा अनेकांनी तिला, तुला हे जमणार नाही असं म्हटलं. पण तिने न खचता दोन वर्षांपासून हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. आता तिच्या व्यवसायाला फेब्रुवारीमध्ये तीन वर्षे पूर्ण होतील.
advertisement
भक्ती पाटीलने सुरुवातीला रस्त्यावर स्टॉल सुरू केला. स्टॉलवर तिला आणि तिच्या मोमोजना खऱ्या अर्थाने डोंबिवलीकर ओळखायला लागले. स्टॉलनंतर तिने एका फूड ट्रकमध्ये हा मोमोटेरियनचा व्यवसाय पुढे नेला. आणि आता या सगळ्या कष्टानंतर तिचे मोमोजचे शॉप आहे. डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या अगदी बाजूलाच हे मोमोटेरियन आहे.
Chicken or Mutton: चिकन की मटन, काय खाणं चांगलं? आहारतज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर
तिच्याकडे मोमोजचे 30 हून अधिक प्रकार मिळतात. या मोमोटेरियनमध्ये तुम्हाला चीज चिली मोमो, कॉर्न चीज मोमो, पनीर चीज मोमो, पनीर पेरी पेरी मोमो, पनीर आचारी मोमो असे अनेक प्रकार मिळतील. यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टीम, फ्राईड आणि कुरकुरे यामध्ये व्हरायटी मिळेल. यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. भक्तीच्या संपूर्ण प्रवासात तिच्या घरच्यांची आणि तिच्या नवऱ्याची तिला विशेष साथ लागली.
भक्तीला पूर्वीपासूनच मोमोज खूप आवडायचे. ती एकदा ट्रिप करिता नेपाळला गेली होती, तेव्हा तिने वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज ट्राय केले आणि तेव्हाच तिने ठरवलं की डोंबिवलीमध्ये असा एखादा शॉप सुरू करायचा जिथे सगळ्या प्रकारचे मोमोज मिळतील. तिच्याकडे मिळणारे स्पेशल सुपी मोमोज खूप प्रसिद्ध आणि युनिक आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला मोमोज प्लेटर कॉम्बो हवा असेल तर त्यामध्ये सुद्धा इथे खूप व्हरायटी आहे.
'माझ्या इथे मिळणारे सगळे मोमोज खूप व्हरायटी मध्ये मिळतात. इतर ठिकाणांपेक्षा माझ्या शॉप मध्ये मिळणाऱ्या मोमोजची टेस्ट वेगळी लागते. त्यामुळे डोंबिवलीकर आवर्जून माझ्याकडे येतात आणि न चुकता मोमोज खूप छान होते अशी कॉम्प्लिमेंट सुद्धा देतात.' असे भक्तीने सांगितले.
कोणाचाही आर्थिक आधार नसताना एखादा व्यवसाय सुरू करून तो भरभराटीस पोहोचवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे सर्वच स्तरातून भक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तुम्हाला सुद्धा भक्तीचे स्पेशल मोमोटेरियन मधले मोमोज खाण्याची इच्छा असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या दत्तनगर मधील प्रगती कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या या दुकानाला भेट द्या.