Chicken or Mutton: चिकन की मटन, काय खाणं चांगलं? आहारतज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर

Last Updated:

Chicken or Mutton: मांसाहारी लोकांना चिकन खावं की मटन? हा प्रश्न अनेकदा पडतो. आहारतज्ज्ञांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

+
चिकन

चिकन की मटन, काय खाणं चांगलं? हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शाकाहार की मांसाहार यावरून जशी मतमतांतरं असतात. अगदी तशीच चिकन खावं की मटन यावरून देखील दिसतात. मांसाहारी लोकांमध्ये देखील काही चिकन प्रेमी असतात तर काहींना फक्त मटन आवडतं. त्यामुळे चिकन चांगलं की मटन हा प्रश्नही अनेकांना पडतो. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी दिलं आहे.
आहारात चिकन आणि मटन दोन्ही असणं वेगवेगळ्या दृष्टीनं फायद्याचं आणि कधी-कधी तोट्याचं देखील असतं. चिकन आणि मटन याचा विचार केल्यास चिकन खाणं जरा अधिक चांगलं मानलं जातं. परंतु, आजारी व्यवक्तीला चिकनपेक्षा मटनाचं सूप देणं जास्त लाभदायी ठरतं. त्यामुळे आजार लवकर बरा होतो, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
चिकन खाणं फायद्याचं असलं तरी ते खाताना काही काळजी घेणं देखील गरजेचं असतं. बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन चांगलं मानलं जातं. त्यामध्ये जास्त प्रमाणात पोषक घटक असतात. चिकन खाताना त्याच्यातील सगळं फॅट काढून टाकलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलंलं असावं. त्याच्यात जास्त प्रमाणात मसल्यांचा वापर करू नये. फक्त उकडलेलं चिकन खाणं किंवा त्याचं सूप पिणं फायद्याचं ठरतं. त्यातून जास्त प्रमाणात प्रोटिन्स मिळतात, असं देखील आहारतज्ज्ञांनी सांगितलं.
advertisement

मटनामुळे वाढतो कोलेस्ट्रॉल

आजारी व्यक्तींना मटनाचे सूप आरोग्यदायी मानले जाते. त्यामुळे अनेकदा मटनाचे सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, मटनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याचा धोका असतो. मटन खाणं चांगलं असलं तरी ते प्रमाणात घाण्याची गरज असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, मटन की चिकन असा विचार केल्यास चिकन खाणं अधिक चांगलं असल्याचं देखील आहारतज्ज्ञ सांगतात. तसेच आहार कोणताही असो तो प्रमाणात खाणंच लाभदायी असंही देशमुख सांगतात.
मराठी बातम्या/Food/
Chicken or Mutton: चिकन की मटन, काय खाणं चांगलं? आहारतज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement