Veg Mutton : शाकाहाऱ्यांचं मटण! वर्षातून फक्त 15 दिवस मिळणारी भाजी, किंमत आणि चव एकदम भारी

Last Updated:
आता फक्त काही तास, मग सुरू होईल नवीन वर्ष धुमधडाक्यात. तुमचेही न्यू इयर प्लॅन्स ठरले असतीलच. वर्षाला निरोप देताना अनेकजण चिकन, मटणावर ताव मारतील. शाकाहारप्रेमीही आपल्या आवडीचे पदार्थ मोठ्या चवीनं खातील. तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतात असेही काही पदार्थ मिळतात, जे असतात शाकाहारी पण त्यांची चव लागते अगदी मटणासारखी.
1/7
सुरणाची भाजी, सोयाबीन, मासवडी, पनीर म्हणजे आहाहा, या पदार्थांना म्हणतात शाकाहाऱ्यांचं मटण. एक भाजी तर खरोखर चवीच्या बाबतीत चिकन, मटणाला तोड देते, असं म्हणतात. 

advertisement
2/7
तुम्ही कधी करटुल्याची भाजी खाल्लीये का? कारल्यासाखी दिसणारी हीच ती भाजी, जी जेमतेम 15 दिवस उपलब्ध असते पण खूप महाग मिळते. तरीही लोक आवडीनं खरेदी करतात. 

3/7
कटुरले किंवा करटोली अशा विविध नावांनी या रानभाजीला ओळखलं जातं. दिसायला ती कारल्याच्या कुटुंबातलीच दिसते. तिलाही काटे असतात.

4/7
विशेष म्हणजे ही भाजी उगवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं खत किंवा औषधांची फवारणी करण्याची आवश्यकता नसते. पूर्णपणे नैसर्गिकरित्या उगवत असल्यानं ती आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते. अनेकजण वर्षभर या भाजीची आतुरतेनं वाट पाहतात. जी प्रामुख्यानं पावसाळ्यात उगवते.

5/7
श्रावणात मांसाहार न करणाऱ्या मांसाहारप्रेमींचा जीवही ही भाजी खाऊन अगदी तृप्त होतो. 60 रुपयांपेक्षा कमी भावानं ती मिळतच नाही. कधीकधी तर 1 किलोसाठी अडीचशे रुपये मोजावे लागतात.

6/7
आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, कटुरले भाजी कारल्याशी मिळतीजुळती आहे. यात भरपूर आयर्न आणि प्रोटीन असतं. या भाजीतून शरिराला मांसाहाराएवढे पोषक तत्त्व मिळतात. यामुळे जुलाब, कावीळ, इत्यादी आजारांवर आराम मिळू शकतो. शिवाय ब्लड शुगर कंट्रोल राहण्यासही मदत मिळते. तसंच अशक्तपणा दूर होतो.

7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement