मुंबई : या दिवाळीत गुंतवणूकदारांसाठी SBI Securities ने एक खास गुंतवणुकीची संधी जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मने 15 टॉप शेअर्सची यादी सादर केली आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना 25% पर्यंत परतावा (रिटर्न) मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
या यादीमध्ये बँकिंग, ऑटो, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग आणि रीसायकलिंग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते या कंपन्यांना मजबूत आर्थिक वाढ, ऑपरेशनल कार्यक्षमतेत सुधारणा आणि बाजारातील पुनरुज्जीवनाचा फायदा मिळेल. या स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांना शॉर्ट-टर्म आणि लॉन्ग-टर्म अशा दोन्ही संधींचा फायदा होऊ शकतो.
1. HDFC Bank – टार्गेट 1,110; अपसाइड 14%
SBI Securities च्या मते, एचडीएफसी बँकेत मजबूत पुनरुज्जीवनाची शक्यता आहे. FY26 मध्ये लोन ग्रोथ 10% आणि FY27 मध्ये 13% राहू शकते. ठेवींमध्ये सातत्याने वाढ आणि संतुलित फंडिंग मिक्समुळे बँकेच्या पुढील विस्ताराला गती मिळेल.
2. TVS Motors – टार्गेट 3,975; अपसाइड 13.2%
टीव्हीएस मोटर ग्रामीण बाजारातील पुनरुज्जीवन आणि निर्यात क्षेत्रातील बळकटीमुळे लाभदायक स्थितीत आहे. GST 2.0 आणि क्षमता-वृद्धीमुळे FY26-27 मध्ये मार्जिन वाढण्याची शक्यता आहे.
3. Apollo Hospitals – टार्गेट 8,675; अपसाइड 13.2%
अपोलो हॉस्पिटल्सच्या कमाईत स्थैर्य आहे. उच्च ऑक्युपंसी रेट, डिजिटल विस्तार आणि अॅसेट-लाइट मॉडेलमुळे कंपनीच्या नफ्यात सातत्य राहील. ब्रोकरेजनं या स्टॉकसाठी लाँग-टर्म पॉझिटिव्ह दृष्टिकोन दिला आहे.
4. Indian Bank – टार्गेट 875; अपसाइड 15.4%
इंडियन बँकेच्या NII, PPOP आणि PAT मध्ये दरवर्षी सुमारे 10% CAGR वाढीची शक्यता आहे. हा स्टॉक सध्या FY27 च्या बुक व्हॅल्यूवर 1.1x दराने ट्रेड करत आहे.
5. Ashok Leyland – टार्गेट 170; अपसाइड 23.2%
अशोक लेलँडमध्ये मार्जिन सुधारण्याची मजबूत शक्यता आहे. कमी इनपुट कॉस्ट आणि प्राइसिंग डिसिप्लिनमुळे FY27 मध्ये नफ्यात वाढ होईल. सध्या स्टॉक 20.5x FY27 अर्निंग्स वर ट्रेड करत आहे.
6. Jubilant FoodWorks – टार्गेट 720; अपसाइड 15.5%
GST रेशनलायझेशनमुळे कन्झम्प्शन आणि QSR (क्विक सर्विस रेस्टॉरंट्स) क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कमी इनपुट कॉस्ट आणि मजबूत सेल्समुळे कंपनीला फायदा होईल.
7. NALCO – टार्गेट 260; अपसाइड 19.7%
NALCO च्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत वाढ आणि उत्पादन वृद्धी कंपनीच्या कामगिरीला गती देतील. FY27 EV/EBITDA वर 6.1x वर ट्रेड होत असून, मजबूत मागणी पुनरुज्जीवनाची शक्यता आहे.
8. NSDL – टार्गेट 1,380; अपसाइड 15.2%
NSDL ला मार्केट रिकव्हरीचा प्रॉक्सी प्ले मानले जात आहे. FY27 पर्यंत रेव्हेन्यू आणि PAT अनुक्रमे 5% आणि 14% CAGR दराने वाढतील, असा अंदाज आहे.
9. Azad Engineering – टार्गेट 2,105; अपसाइड 22.5%
आझाद इंजिनियरिंग FY27 पर्यंत 42.7% PAT CAGR देऊ शकतो. मजबूत ऑर्डर बुक आणि एयरोस्पेस व एनर्जी कॉम्पोनेंट्स विभागातील वाढ कंपनीसाठी फायदेशीर ठरेल.
10. Oswal Pumps – टार्गेट 970; अपसाइड 25.2%
FY27 पर्यंत कंपनीच्या रेव्हेन्यू आणि नफ्यात 30% पेक्षा जास्त CAGR वाढ अपेक्षित आहे. विस्तार योजनांमुळे आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेमुळे सर्वाधिक अपसाइडची शक्यता आहे.
11. Subros Ltd – टार्गेट 1,355; अपसाइड 21.2%
Subros ला PV/CV उद्योगातील वाढत्या मागणीचा आणि GST कपातीचा फायदा होईल. त्यामुळे विक्रीत वाढ होईल. स्थिर चलनविषयक धोरणामुळे कंपनीला पाठबळ मिळेल.
12. Indian Metals & Ferro Alloys (IMFA) – टार्गेट 1,415; अपसाइड 21.7%
IMFA आपल्या काळींगनगर विस्तार प्रकल्पातर्गत फेरोक्रोम उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. स्टॉक FY27 P/E वर 12x वर ट्रेड होत असून, स्थिर वाढीची दृश्यमानता आहे.
13. Fiem Industries – टार्गेट 2,340; अपसाइड 22.5%
फिएम इंडस्ट्रीजला टू-व्हीलर रिकव्हरी आणि LED लाइटिंग ट्रान्झिशनमुळे फायदा होईल. तसेच PV (पॅसेंजर व्हेईकल) सेगमेंटमध्ये प्रवेश केल्याने अतिरिक्त ग्रोथची संधी मिळेल.
14. Swaraj Engines – टार्गेट 5,112; अपसाइड 24.2%
ट्रॅक्टरवरील GST कपातीमुळे रिप्लेसमेंट डिमांड वाढेल. 3% डिव्हिडंड यील्ड आणि उच्च पेआउट रेशोमुळे हा स्टॉक ग्रोथ आणि इनकम दोन्ही देणारा पर्याय आहे.
15. Pondy Oxides & Chemicals – टार्गेट 1,530; अपसाइड 23.4%
POCL चा रीसायकलिंग बिझनेस आणि आगामी फेज-2 विस्तार कंपनीच्या वाढीला चालना देईल. लिथियम-आयन रीसायकलिंगमध्ये प्रवेश Vision 2030 नुसार 20%+ CAGR ग्रोथ टार्गेट साध्य करण्यात मदत करेल.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.