सर्वात आधी पीएफमध्ये कसे पैसे जमा होतात आणि त्याचे नियम काय आहेत? चला जाणून घेऊ.
नियोक्ता हिस्सा म्हणजे काय?
तुम्ही तुमच्या मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये भरता, तर तुमचा नियोक्ताही (कंपनी) तेवढीच रक्कम भरतो. म्हणजेच प्रत्येक महिन्यात तुमच्या खात्यात दुप्पट रक्कम जमा होते. या रकमेवर दरवर्षी व्याज मिळतं. उदाहरणार्थ, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी EPFO 8.25 टक्के व्याज देत आहे. म्हणजे तुम्हाल त्या वर्षाला जमा असलेल्या रकमेवर 8.25 टक्के व्याज मिळेल.
advertisement
मात्र लक्षात ठेवा की नियोक्त्याचा (कंपनीचा) संपूर्ण हिस्सा थेट तुमच्या पीएफ खात्यात जात नाही. त्यातील 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा होतो, तर उर्वरित 3.67 टक्के पीएफ खात्यात जातो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 4,000 रुपये भरले, तर तुमचा नियोक्ता देखील 4,000 रुपये भरतो. पण त्यातील केवळ 1,222 रुपयेच तुमच्या पीएफ खात्यात जमा होतील, तर उरलेली रक्कम EPS मध्ये जाईल. हे सर्व तपशील तुम्हाला तुमच्या EPFO पासबुक मध्ये स्पष्टपणे दिसतात. तुम्ही तो डाऊनलोड करुन पाहू शकता.
नियोक्ता कंपनीचा हिस्सा काढता येतो का?
अनेक कर्मचारी विचारतात की नियोक्त्याचा हिस्सा काढता येतो का? याचे उत्तर होय आहे, पण काही अटींसह:
वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही नियोक्ता हिस्स्यासह संपूर्ण रक्कम काढू शकता. 2 महिने बेरोजगार राहिल्यासही तुम्हाला ही सुविधा मिळते. 1 महिन्याच्या बेरोजगारीनंतर तुम्ही 75 टक्के रक्कम काढू शकता. तसेच उपचार, शिक्षण किंवा लग्नासाठी पैसे लागल्यास हे पैसे फक्त कर्मचारी हिस्स्यातून मिळतात.
पण घर खरेदी किंवा बांधकामासाठी अर्ज केल्यास, नियोक्त्याच्या हिस्स्यातूनही काही रक्कम काढता येते.
तुमच्या पीएफ पासबुकमधील प्रत्येक कॉलमाचं स्वतःचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे कर्मचारी म्हणून तुम्ही किती रक्कम भरली आहे आणि कंपनीकडून तुम्हाला किती फायदा मिळतो आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. पीएफबद्दल जितकी जास्त माहिती, तितका भविष्यात अधिक फायदा.