TRENDING:

4 मित्रांनी एकत्र येत सुरू केला बिझनेस, दिवसाला कमावतात 15 हजार रुपये!

Last Updated:

नोकरी पेक्षा व्यवसाय बरा असा विचार सध्या तरुणाई करताना दिसत आहे. डोंबिवलीमध्ये सुध्दा एका गावातल्या चार तरुणांनी मिळून मुंबईमध्ये येऊन काहीतरी नवीन करूया या विचाराने डोंबिवलीतील घरडा सर्कल इथे स्वतःचे फूड ट्रक सुरू केले.

advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

डोंबिवली : सध्या तरुणाई व्यवसाय करण्याकडे आकर्षित होत आहेत. नोकरी पेक्षा व्यवसाय बरा असा विचार सध्या तरुणाई करताना दिसत आहे. डोंबिवलीमध्ये सुध्दा एका गावातल्या चार तरुणांनी मिळून मुंबईमध्ये येऊन काहीतरी नवीन करूया या विचाराने डोंबिवलीतील घरडा सर्कल इथे स्वतःचे फूड ट्रक सुरू केले. क्रेविंग वोक असे या फूड ट्रकचे नाव असून इथे मिळणारे चायनीज डोंबिवलीकरांच्या पसंतीस उतरले आहे.

advertisement

निनाद पांचाळ, निखिल चव्हाण, संदेश पवार आणि निशांत कांबळे अशी या तरुणांची नावे असून ही सगळी तरुण मंडळी कणकवलीची आहे. कणकवली वरून इथे येऊन गेले तीन वर्ष ते हा व्यवसाय करत आहेत. पूर्वी गावी त्यांच एक स्वतःचा हॉटेल होतं परंतु लॉकडाऊनमध्ये ते बंद पडलं आणि त्यानंतर हे सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केला परंतु जॉबमधून हवा तितका इनकम घेत नव्हता आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा या व्यवसायाकडे वळण्याचा ठरवलं. आता या व्यवसायातून या चौघांची एका दिवसाची कमाई ही तब्बल 15 हजार रुपये होते. शनिवार आणि रविवारी ही कमाई अधिक होते.

advertisement

गोल्डन अन् मसाला टीही विसराल, डोंबिवलीतल्या दाम्पत्याची कमाल, इथं चहासाठी लागतात रांगा

इथली खासियत म्हणजे क्रेवींग स्पेशल कॉम्बो...

इथे फक्त 99 रुपयाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बो चायनीज उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये राइस किंवा नूडल्स, सोया चिली, मंचूरियन पकोडा, आणि मोइतो असं सगळं फक्त 99 मध्ये मिळेल.

'आमच्यातले एका मित्राने आधी येऊन इथे हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी याला हातभार लावून एकत्र येऊन आता व्यवसाय पुढे नेत आहोत. आमच्या इथ मिळणारे चायनीज कॉम्बोज डोंबिवलीमध्ये आम्हीच पहिल्यांदा आणले. आता ते इथे खूप प्रसिद्ध झाले आहेत' असे निनाद पांचाळ यांनी सांगितले.

advertisement

मित्र फक्त पाय खेचण्यासाठी नव्हे तर खांद्याला खांदा लावून एकत्र यश सुद्धा संपादन करू शकतात हे चौघांकडे पाहिल्यावर कळतं. मंडळी तुम्हाला सुद्धा चायनीजचे कॉम्बोज खाण्याची इच्छा असेल तर आवर्जून घरडा सर्कल इथे पेंढारकर कॉलेजच्या अगदी समोरच असणाऱ्या क्रेविंग वोक या फुड ट्रकला भेट द्या.

मराठी बातम्या/मनी/
4 मित्रांनी एकत्र येत सुरू केला बिझनेस, दिवसाला कमावतात 15 हजार रुपये!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल