गोल्डन अन् मसाला टीही विसराल, डोंबिवलीतल्या दाम्पत्याची कमाल, इथं चहासाठी लागतात रांगा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Tea Business: डोंबिवलीतील मराठी दाम्पत्य तब्बल 15 हून अधिक फ्लेवरचा चहा विकत आहे. या ठिकाणी चहा पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली: सध्याच्या काळात अनेकजण खाद्य पदार्थांच्या व्यवसायाकडे वळत आहेत. अमृततुल्य चहाचे तर अनेक ब्रँड आपल्याला सर्वत्र दिसतात. पण डोंबिवलीतील एक मराठी जोडपं चक्क फ्लेवर्समध्ये चहा विकतंय. श्रुती आणि प्रेम कांबळे यांनी स्वत:चा टी ब्रँड सुरू केला असून ते तब्बल 15 हून अधिक प्रकारचे चहा विकत आहेत. विशेष म्हणजे गोल्डन अन् मसाला टीही विसरायला लावणारा हा चहा पिण्यासाठी ‘टी गार्डन’मध्ये नेहमीच गर्दी असते.
advertisement
डोंबिवलीतील श्रुती आणि प्रेम कांबळे हे दाम्पत्य लग्नानंतर नोकरी करत होतं. परंतु, या दोघांनाही काहीतरी व्यवसाय करावासा वाटत होता. डोंबिवलीत चहाचा स्पेसिफिक कोणताच व्यवसाय नाही म्हणूनच त्यांनी यातच व्यवसाय करण्याचं ठरवलं. श्रुती या फॅशन डिझायनर असून लोअर परेलला जॉबला होत्या. आता त्यांनी जॉब सोडून संपूर्ण वेळ व्यवसायाला देण्याचे ठरवले आहे. तर प्रेम पत्नीला हातभार लावत प्रायव्हेट जॉब आणि हा व्यवसाय दोन्ही सांभाळत आहेत.
advertisement
विशेष म्हणजे टी गार्डनमध्ये चहाचे विविध 15 हून अधिक फ्लेवर्स मिळतात. तसेच मिल्क शेकमध्येही या ठिकाणी फ्लेवर्स उपबल्ध आहेत. चहा आणि मिल्क शेक एकाच ठिकाणी मिळत असल्याने खाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे इथं नेहमीच गर्दी असते. दिवसाला 3 ते 4 हजार रुपयांपर्यंत कमाई या व्यवसायातून होत असल्याचंही प्रेम सांगतात.
advertisement
कशी सूचली आयडिया?
“आम्ही एकदा बेळगावला गेलो होतो. तिथे आम्ही एका चहाच्या दुकानात चहा प्यायलो. त्यांच्या इथेही असेच खूप व्हरायटी होती. आम्ही ठरवलं की आपणही डोंबिवलीत असा चहाचा व्यवसाय करावा. मग आम्ही टी गार्डन सुरू केलं. आता काहीतरी युनिक आहे म्हणून डोंबिवलीकर आवर्जून भेट द्यायला येतात आणि वेगवेगळ्या चहाची टेस्ट करतात,” असे प्रेम कांबळे यांनी सांगितले.
advertisement
चहाचे कोणते फ्लेवर?
इथे तुम्हाला चहा मध्ये नेहमीचा अमृततुल्य चहा तर मिळेलच पण त्यासोबतच बटरस्कॉच टी, व्हॅनिला टी, रोज टी, तुळशी टी, गुळाचा चहा, ब्लॅक लेमन टी, हनी लेमन टी असे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. मिल्कशेक मध्ये सुद्धा तुम्हाला अगदी मँगो मिल्कशेक पासून ते बदाम केसर शेक पर्यंत सगळं काही मिळेल. इथल्या मिल्कशेक मध्ये 60 रुपयांना मिळणारा ब्लॅक करंट शेक हा खूप टेस्टी आणि डोंबिवलीकरांचा आवडत आहे. तुम्ही देखील इथे भेट देणार असाल तर हा मिल्कशेक नक्की मागवा.
advertisement
कोल्ड कॉफी, कॉफी, ज्युसेस यामध्ये सुद्धा तुम्हाला येथे खूप वरायटी मिळेल. चहा आणि कॉफी सोबतच इथे सँडविच, बर्गर, पिझ्झा आणि मॅगी हे पदार्थ सुद्धा मिळतील. इथे मिळणारी चीज मॅगी तर अप्रतिम आहे. तुम्हाला डोंबिवलीत जर चिजी मॅगी कुठे खायची इच्छा झाली तर इथे नक्की या, असं श्रुती सांगतात.
दरम्यान, व्यवसायाची इच्छा असेल आणि जर एकमेकांची साथ असेल तर मराठी माणूस काहीही करू शकतो, असा विश्वास या दोघांकडे पाहिल्यावर येतो. तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरच्या चहाची चव घ्यायची असेल तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड येथे असणाऱ्या टी गार्डनला भेट द्या.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 18, 2024 9:09 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
गोल्डन अन् मसाला टीही विसराल, डोंबिवलीतल्या दाम्पत्याची कमाल, इथं चहासाठी लागतात रांगा