कांदा, कोथिंबीर अन् मक्याचा चिवडा, डोंबिवली असा वडापाव खाल्लाच नसेल

Last Updated:

डोंबिवलीत वडापाव फार जुने आणि प्रसिद्ध आहेत. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारा ठाकूर वडापाव डोंबिवलीकरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

+
News18

News18

साक्षी पाटील, प्रतिनिधी 
डोंबिवली : डोंबिवलीत अनेक खाद्यपदार्थांचे व्यवसाय आहेत. वडापाव तर डोंबिवलीकरांचा आवडीचा पदार्थ. डोंबिवलीत वडापाव फार जुने आणि प्रसिद्ध आहेत. डोंबिवली स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारा ठाकूर वडापाव डोंबिवलीकरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यांच्या इथे मिळणारी हिरवी चटणी, कांदा आणि कोथिंबीर यामुळे यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. 1972 पासून डोंबिवलीमधला हा वडापाव खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
ठाकूर वडापाव सध्या अक्षय पवार चालवतात. वडापावसोबत इथे कांदा, कोथिंबीर आणि भरभरून मक्याचा चिवडा दिला जातो. या वडापावची किंमत 23 रुपये आहे. एक वडापाव खाल्ला की तुमचे पोट हमखास भरून जाईल आणि मन सुद्धा. इथे फक्त तुम्हाला वडापावच नाही तर त्यासोबतच समोसा भाव, भजी पाव, कांदा भजी प्लेट, बटाटा भजी असे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. शनिवार आणि रविवारी याविकेंडच्या दिवसांमध्ये तर इथे इतकी गर्दी असते की वडापाव घेण्यासाठी अक्षरशः लाईन लागते. डोंबिवलीतील खवय्ये नेहमी तिथे येत असतात.
advertisement
'1972 ला हा व्यवसाय जेव्हा सुरू झाला तेव्हापासूनच कांदा आणि मक्याचा चिवडा हे या ठाकूर वडापावचे वैशिष्ट्य आहे. 2007 दरम्यान माझ्या वडिलांनी ठाकूर यांच्याकडून हा वडापाव विकत घेतला. तेव्हापासून आम्हीच हा व्यवसाय पुढे चालवत आहोत. डोंबिवलीकरांचा आजही तसाच उदंड प्रतिसाद आमच्या वडापावला मिळत आहे' असे अक्षय पवार यांनी सांगितले.
advertisement
'आम्ही गेले पंधरा वर्ष मित्र एकत्र येऊन हा वडापाव खायला जातो. शाळेत असल्यापासूनच हा आमचा आवडीचा पदार्थ आहे. ठाकूर वडापाव म्हणजे प्रेम असं समीकरण आमचं झालंय' असे तिथे गेले पंधरा वर्ष वडापाव खायला येणाऱ्या रमेश म्हात्रे या खवय्याने सांगितले.
मंडळी तुम्हाला सुद्धा हा कांदा, कोथिंबीर आणि मक्या सोबत मिळणारा चविष्ट वडापावची चव चाखायची असेल तर डोंबिवली स्थानकापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आगरकर रोडवर असणाऱ्या ठाकूर वडापावला जा. आणि मस्त गरमागरम वडापाव खा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
कांदा, कोथिंबीर अन् मक्याचा चिवडा, डोंबिवली असा वडापाव खाल्लाच नसेल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement