तुम्ही कधी खाल्लाय का ब्लॅक बर्गर? एकदा पाहा हा VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
शरण मेहता यांच्या फूड ट्रकवर कमी दरात स्पेशल ब्लॅक बर्गर मिळतो. तसेच हॉट डॉग, सँडविच यांच्याकडेच मिळत असलेल्या युनिक खाद्य पदार्थ खाण्यासाठी नेहमी गर्दी बघायला मिळत असते.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : अनेकांचे स्वप्न असते आपला स्वतःचा कुठलातरी व्यवसाय असावा. काही लोक ते पूर्ण देखील करत असतात. असेच नाशिकचे शरण मेहता यांनी देखील केले. नाशिकमध्ये इटालियन, अमेरिका आणि मेक्सिकन पदार्थांचा पहिला फूड ट्रक त्यांनी सुरू केला आहे. सर्वसामान्य लोकांना देखील 5 स्टार हॉटेलप्रमाणे खाद्यपदार्थ हे कमी दरात चाखता यावे जेणेकरून त्यांना देखील याचा आनंद अनुभवता येईल याकरिता नाशिक येथील कॉलेज रोड परिसरात ते आपली फूड ट्रक लावत असतात. त्यांच्याकडे स्पेशल ब्लॅक बर्गर मिळतो.
advertisement
शरण मेहता यांनी 'द बॉम्बे फूड कंपनी' ह्या नावाने फूड ट्रक गेल्या 2 वर्षांपासून सुरू केला आहे. मेहता हे पहिल्यापासून फूड इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहेत. परंतु अनेक लोकांप्रमाणे कोरोनानंतर शरण यांनी देखील नोकरीत उतार-चढाव येत असल्याने स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून त्यांनी कमी भांडवलात फूड ट्रक उघडण्याचे ठरविले.
advertisement
आज बघता बघता नाशिकमध्ये त्यांचे स्वतःहाचे 2 फूड ट्रक त्यांनी सुरू केले आहेत. त्यांच्याकडे नाशिकमध्ये कुठेही सहज उपलब्ध होणारा आणि एकदम कमी दरात स्पेशल ब्लॅक बर्गर त्यांच्याकडे मिळत असतो. तसेच हॉट डॉग, सँडविच त्यांच्याकडे मिळत असलेल्या युनिक खाद्य पदार्थ खाण्यासाठी नेहमी गर्दी बघायला मिळत असते.
advertisement
शरण मेहता सांगतात की, नाशिककर खवय्यांना लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी शहरात उपलब्ध झाली पाहिजे. त्याकरिता ही फूड ट्रक सुरू केली. आमच्याकडे बॉम्बे हॉट डॉगपासून नोट्स निब्बल्स, प्राईज, सँडविच, पिझ्झा, ब्लॅक बर्गर असे विविध खाद्य पदार्थ 100 रुपयांपासून मिळतात. त्यातच आमच्याकडे मिळणारा नाशिकमधील पहिला ब्लॅक बर्गर फक्त 180 रुपयांना मिळतो.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 17, 2024 5:09 PM IST