दोन आजोबा घाबरून कोसळले, पोलिसाची उंच उडी पाहून तर हसू आवरणार नाही, मगरीच्या रेस्क्यूचा मजेदार Video वारंवार प्ले करुन पाहाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर हा मगरीच्या रेस्क्युचा व्हिडीओ आहे. पण त्यामध्ये एकामागोमाग एक असे काही प्रकार घडतात की ते आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खूपच मजेदार आहे.
मुंबई : सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही, इथे दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांशी संबंधी व्हिडीओ पाहणाऱ्यांची आणि शेअर करणाऱ्यांची इथे कमी नाही. लोकांना प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ सोशल मीडियावर पाहाणं मनोरंजक वाटतं. अशातच एक मगरीशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे, जो खूपच मनोरंजक आहे.
खरंतर हा मगरीच्या रेस्क्युचा व्हिडीओ आहे. पण त्यामध्ये एकामागोमाग एक असे काही प्रकार घडतात की ते आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो खूपच मजेदार आहे.
मध्यप्रदेशमधील एका गावात मगरीची एन्ट्री होते. अशावेळी मगरीला गावामधून नेण्यासाठी काही लोक तिथे पोहोचतात, त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस देखील तेथे पोहोचतात. अशात एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती मगरीच्या तोंडावर गोणपाट टाकतो. त्याला वाटतं की हे टाकल्याने मगर शांत होईल आणि तिला काही दिसणार नाही, ज्यामुळे आपण मगरीला सहज उचलून नेऊ शकतो. पण त्याच्यासोबत या सगळ्याच्या अगदी उलट घडलं.
advertisement
गोणपाट मगरीच्या तोंडावर टाकताच मगर चवताळली आणि ती उलटी फिरली. हे पाहाताच तिला रेस्क्यु करायला आलेली व्यक्ती ही घाबरली. एवढंच नाही तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की कसं तिथे असलेला एक स्थानिक पोलीसही घाबरतो आणि उंच उडी मारुन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
हा व्हिडीओ इथेच थांबत नाही, खरी मज्जा तर आणखी पुढे आहे. ही मगर उलटी फिरते आणि पुन्हा धावू लागते. त्यावेळी तिथे दोन आजोबा असतात ते दोन्हीही घाबरुन खाली पडतात. एक आजोबा कसेबसे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरे आजोबा मात्र इतके घाबरतात की तिथून उठण्याचंही भान त्यांना रहात नाही.
advertisement
advertisement
नशिबाने मगरीने कोणावरच हल्ला केला नाही, त्यामुळे कोणी जखमी झालं नाही. पण तिने आपले प्राण वाचवून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ इथेच थांबला, त्यामुळे पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ newsdotz
नावाच्या इंस्टाग्राम व्हिडीओवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यावर 'मध्यप्रदेशातील नीमच येथे मगर पकडताना पथकाचे त्राण गेले; परिसरात एकच खळबळ' असं लिहिलं गेलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/Viral/
दोन आजोबा घाबरून कोसळले, पोलिसाची उंच उडी पाहून तर हसू आवरणार नाही, मगरीच्या रेस्क्यूचा मजेदार Video वारंवार प्ले करुन पाहाल