TRENDING:

Gold Rate News: सोन्याचा नवा विक्रम, ऐतिहासिक झेप; आजवर कधीच असं झाले नाही, Expertनी सांगितला सर्वोत्तम पर्याय

Last Updated:

Gold Funds: या आठवड्यात सोन्याच्या फंडात तब्बल 16 अब्ज डॉलरची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. जागतिक अनिश्चिततेत सोनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरत आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: इलारा कॅपिटलच्या एका नवीन अहवालानुसार या आठवड्यात सोन्यामध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास प्रचंड वाढलेला दिसत आहे. सोन्याच्या फंडमध्ये तब्बल 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असून ही गेल्या 8 महिन्यांतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. साधारणपणे सोन्याच्या फंडात दर आठवड्याला सुमारे 3 अब्ज डॉलरची गुंतवणूक होते. परंतु यावेळी सरासरीपेक्षा 5 पट अधिक गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे.

advertisement

या वाढीमागे मुख्य कारण म्हणजे एप्रिल 2025 मधील उच्च पातळी ओलांडून सोन्याने नवीन विक्रमी उंची गाठली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानत आहेत.

विक्रमी गुंतवणूक:

-या आठवड्यात सोन्याच्या फंडमध्ये 16 अब्ज डॉलरची खरेदी झाली.

advertisement

-गेल्या चार महिन्यांपासून सोन्यामध्ये सातत्याने गुंतवणूक होत असून हा एक मजबूत कल दर्शवतो.

-नेहमीच्या सरासरीपेक्षा 5 पट जास्त गुंतवणूक झाल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वेगाने वाढला आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ:

-सोन्याने एप्रिल 2025 ची उच्च पातळी मोडत नवीन विक्रम स्थापित केला आहे.

advertisement

-आता सोने अशा पातळीवर पोहोचले आहे. जिथे ते यापूर्वी कधीही पोहोचले नव्हते.

गुंतवणूकदारांसाठी संकेत:

-सध्याच्या जागतिक अनिश्चितता आणि महागाईच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे सोन्याला त्यांची पहिली पसंती मिळत आहे.

-गेल्या 4 महिन्यांपासून सोन्यात होणारी सातत्यपूर्ण गुंतवणूक सोन्याबद्दलची सकारात्मक भावना कायम असल्याचे दर्शवते.

advertisement

-यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. सोन्यामध्ये म्युच्युअल फंड SIP किंवा गोल्ड ETF द्वारे गुंतवणूक करणे एक सोपा आणि सुरक्षित पर्याय बनू शकतो.

मराठी बातम्या/मनी/
Gold Rate News: सोन्याचा नवा विक्रम, ऐतिहासिक झेप; आजवर कधीच असं झाले नाही, Expertनी सांगितला सर्वोत्तम पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल