मुंबई : भारतामध्ये सोन्याच्या किंमती सातत्याने नव्या उच्चांकावर पोहोचत आहेत. 10 ऑक्टोबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,21,525 इतका झाला आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एचडीएफसी बँकेचे हे खास ऑफर तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरू शकते.
advertisement
जर तुमच्याकडे एचडीएफसी इन्फिनिया क्रेडिट कार्ड (HDFC Infinia Credit Card) असेल, तर तुम्ही 17% पर्यंत डिस्काऊंट दरात Gold Coin (सोन्याचे नाणे) खरेदी करू शकता. वाढत्या सोन्याच्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर हे ऑफर तुम्हाला केवळ बचतीची संधी देत नाही, तर प्रिमियम कार्डच्या एक्सक्लुझिव्ह फायद्यांचाही लाभ घेण्याची संधी देते.
गोल्ड क्वॉइनवर कशी कराल बचत?
या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला HDFC SmartBuy पोर्टलवरून Myntra चा व्हाउचर खरेदी करावा लागेल. जर तुम्ही हा व्हाउचर एचडीएफसी इन्फिनिया क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विकत घेतला, तर तुम्ही 16.66% (सुमारे 17%) पर्यंत बचत करू शकता.
मात्र एका महिन्यात व्हाउचरद्वारे तुम्ही कमाल 15,000 पर्यंतच बचत करू शकता. यानंतर तुम्ही Myntra च्या वेबसाइटवरून गोल्ड क्वॉइन खरेदी करून पेमेंटसाठी हाच व्हाउचर वापरू शकता. या प्रक्रियेद्वारे तुम्ही सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीवर 17% पर्यंत सूट मिळवू शकता.
HDFC इन्फिनिया क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
एचडीएफसी इन्फिनिया क्रेडिट कार्ड हे भारतातील सर्वात प्रीमियम आणि सुपर-लक्झरी क्रेडिट कार्ड्सपैकी एक आहे. हे कार्ड मुख्यतः हाय-इनकम ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
या कार्डद्वारे तुम्हाला प्रवास (Travel), डाइनिंग, गोल्फ आणि शॉपिंग यांसारख्या श्रेणींमध्ये आकर्षक फायदे मिळतात. या कार्डचा मेटल एडिशन (Metal Edition) देखील उपलब्ध आहे, जो त्याला एक आलिशान लुक देतो.
फी आणि अटी
-या कार्डची जॉइनिंग फी आणि वार्षिक फी 12,500 आहे.
-पण जर तुम्ही वर्षभरात 10 लाखांहून अधिक खर्च केला, तर ही वार्षिक फी माफ केली जाते.
-हे एक Invite-only कार्ड आहे, म्हणजेच ते सर्वांसाठी उपलब्ध नाही.
मात्र बँकिंग रिलेशनशिप व्हॅल्यू (तुमचे खाते, व्यवहार आणि आर्थिक संबंध) चांगले असतील. तर तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता.