नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या 56व्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीचे नेतृत्व केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यांनी सांगितले की, नवी जीएसटी दररचना 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
advertisement
यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर लक्झरी वस्तूंना 40 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
कौन्सिलच्या निर्णयानुसार आता देशात फक्त दोन प्रमुख जीएसटी स्लॅब राहतील 5 टक्के आणि 18 टक्के. बहुतेक उत्पादने आणि सेवा या दोन्ही स्लॅबमध्ये बसवण्यात आल्या आहेत.
लक्झरी वस्तूंवरील 40% जीएसटी:
40 टक्क्यांच्या या उच्च स्लॅबमध्ये महागडी लक्झरी आयटेम्स तसेच वैध नशेचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. यामध्ये दारू, तंबाखू आणि सिगारेट्स यांचा समावेश आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट आहे – समाजातील लोकांना दारू आणि धूम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी त्यावर अधिक कर लावण्यात आला आहे.
कपडे होतील स्वस्त:
मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. आता 2500 रुपयांपर्यंतचे कपडे फक्त 5% जीएसटी स्लॅबमध्ये येतील. याआधी फक्त 1000 पर्यंतचे कपडे या श्रेणीत होते. तर त्यापेक्षा महाग कपड्यांवर 12% कर लावला जात होता. नवीन निर्णयामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीचा कालावधी:
जीएसटी कौन्सिलची ही दोन दिवसीय बैठक 4 सप्टेंबर रोजी संपणार आहे. या संपूर्ण बैठकीचे नेतृत्व केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन करत आहेत.