मेटाचे त्रैमासिक निकाल वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त राहिले. यासोबतच श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्ग यांच्या आधी टॉप-3 वर एलन मस्क, जेफ बेजोस आणि बनॉर्ड अरनॉल्ट आहेत. बिल गेट्स 145 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह 5 व्या क्रमांकावर आहेत.
Zerodha वर असं काय झालं ज्यामुळे गुंतवणूकदाराचे पैसे बुडाले, काय आहे नेमका प्रकार?
35 अब्ज डॉलरच्या खाली गेली होती मार्क यांची संपत्ती
advertisement
झुकेरबर्ग यांची संपत्ती 2022 च्या अखेरीस 35 अब्ज डॉलरच्याही खाली गेली होती. महागाई आणि व्याजदरांमध्ये वाढीमुळे टेक्नॉलॉजी शेअरमध्ये घट झाल्याने असं झालं आहे. सध्या झुकेरबर्ग यांना फायदा होणार आहे. कारण एक शेअर होल्डर म्हणून त्यांना मेटाच्या पहिले डिव्हिडेंडच्या आधी जवळपास 70 कोटी डॉलर वार्षिक मिळतील. मेटाने मार्चपासून क्लास A आणि B च्या सामान्य स्टॉकसाठी 50 सेंट प्रति शेअरच्या तिमाही रोख डिव्हिडेंडची घोषणा केली. ब्लूमबर्गच्या डेटानुसार, मार्क यांच्याजवळ जवळपास 35 कोटी शेअर असल्याने ते टॅक्सचं पेमेंट करण्याच्या आधी प्रत्येक तिमाही पेमेंटमध्ये जवळपास 17.5 कोटी डॉलर घरी नेतील.
पेटीएमनंतर RBIचा बजाज हौसिंग फायनान्सला दणका; वाचा का आणि काय केली कारवाई?
झुकेरबर्ग यांना मिळाला होता 2.71 कोटी डॉलरचा कंपनसेशन
2022 मध्ये झुकेरबर्ग यांना एकूण 2.71 कोटी डॉलरचं कंपनसेशन मिळालं होतं. यामध्ये 1 डॉलरची बेस सॅलरी आणि प्रायव्हेट सिक्योरिटी कॉस्टचा समावेश होता. मेटाने आतापर्यंत गेल्या वर्षीसाठी एग्जीक्यूटिव्ह कंपनसेशनची घोषणा केलेली नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला.