कंपनीकडून निर्णय
‘द इंफॉर्मेशन’ या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, गुगलच्या प्रवक्त्याने या कपातीला दुजोरा देताना सांगितले की, गेल्या वर्षी प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस टीम्सच्या विलीनीकरणानंतर कंपनी अधिक कार्यक्षम आणि गतिमान झाली आहे. या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, कंपनीने पूर्वी जाहीर केलेल्या स्वैच्छिक निवृत्ती योजनेशिवाय काही पदांमध्ये कपात केली आहे.
गुगलने स्पष्ट केले की, प्रभावित पदांची अचूक संख्या जाहीर करण्यात आलेली नसली. तरीही ही छंटनी कंपनीच्या कारभार अधिक सुटसुटीत करणे आणि खर्च नियंत्रणात आणणे या व्यापक धोरणाचा भाग आहे.
advertisement
जागतिक पातळीवर कामगार कपातीची लाट
गुगलसह अनेक मोठ्या कंपन्या सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे कामगार कपात करत आहेत. अॅमेझॉन, इंटेल आणि गोल्डमॅन सॅक्स यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचे पाऊल उचलले आहे.
आधीच्या अहवालांनुसार, अॅमेझॉन 3 अब्ज डॉलर वाचवण्यासाठी सुमारे 14,000 व्यवस्थापकीय पदे कमी करण्याची योजना आखत आहे. इंटेलनेही 2024 मध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीनंतर मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्याची तयारी दर्शवली आहे.
गोल्डमॅन सॅक्स देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 3 ते 5 टक्के कपात करण्याच्या तयारीत आहे. ही कपात वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर केली जाईल, असा अहवाल समोर आला आहे.
बँकिंग क्षेत्रातही परिणाम
बँक ऑफ अमेरिकाने अलीकडेच 150 जूनियर बँकर्सच्या पदांमध्ये कपात केली होती. बहुतेक कर्मचाऱ्यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या बाहेरील भूमिका दिल्या गेल्या आहेत. या ट्रेंडनुसार जागतिक आर्थिक अनिश्चितता लक्षात घेता येत्या काही महिन्यांत आणखी कंपन्या अशीच पावले उचलू शकतात.