‘S&P 500’ देखील कोसळला
S&P 500 निर्देशांकही 3.8 टक्क्यांनी घसरला आणि हा गेल्या काही वर्षांतील सर्वात वाईट आठवडा ठरला आहे. करोनानंतर मार्च 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का दिल्यानंतर एवढी मोठी घसरण यापूर्वी झाली नव्हती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विक्रमी शिखर गाठलेला हा निर्देशांक आता 20 टक्क्यांपेक्षा अधिक घसरला आहे.
सोन्याच्या बाजारात जपानचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ट्रम्पच्या टॅरिफ प्लॅनला झटका
advertisement
'Bear Market' ची भीती
गुंतवणूक क्षेत्रात जेव्हा एखादा निर्देशांक 20% पेक्षा जास्त घसरतो तेव्हा त्याला "Bear Market" असे म्हटले जाते. म्हणजे ही सामान्य 10% घसरण नसून दीर्घकालीन मंदीचा स्पष्ट इशारा असतो. S&P 500 हे निर्देशांक लाखो अमेरिकन गुंतवणूकदारांच्या 401(k) रिटायरमेंट प्लॅन्सचं केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यातील घसरण म्हणजे सामान्य नागरिकांच्या बचतींनाही जबरदस्त फटका बसतो.
शेअर बाजाराचा ‘क्रॅश’,सोन्याचा ‘बूम’; 24 तासांत एवढं महागलं की सगळं गणित बिघडलं!
घसरणीमागचं कारण?
-ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफ्समुळे व्यापार युद्धाचा धोका निर्माण झाला आहे.
-या टॅरिफमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
-गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याने सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळण्याचा कल आहे.
काय पुढे होऊ शकतं?
जर ही घसरण अशीच चालू राहिली तर संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्थेवर, त्याचबरोबर जगभरातील बाजारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणजे बॉण्ड्स, सोने किंवा स्विस फ्रँक यांसारख्या पर्यायांकडे वळत आहेत.
