Gold Price Today: शेअर बाजाराचा ‘क्रॅश’ आणि सोन्याचा ‘बूम’; 24 तासांत एवढं महागलं की सगळं गणित बिघडलं!
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Price: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला. एका बाजूला बाजार खाली जात असताना दुसऱ्या बाजूला सोन्याचे दर मात्र रॅकेटच्या वेगाने वर जात आहेत.
मुंबई: भारतीय शेअर बाजारात आज सकाळपासूनच जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. जागतीक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून शेअर बाजाराच्या पडझडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याचदरम्यान दुसऱ्या बाजूला सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशांतर्गत आणि जागतिक बाजारात दोन्ही ठिकाणी सोना आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले
MCX (मल्टी कमॉडिटी एक्सचेंज) वर 5 जून 2025च्या डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी वाढून 88,204 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तसेच चांदीही 1.25 टक्क्यांनी महागली असून तिचा दर 88,303 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर
जागतिक पातळीवर COMEX वर सोन्याचा भाव 0.42 टक्क्यांनी वाढून 3048.20 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली असून ती 2.69 टक्क्यांनी महागून 30.005 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.
advertisement
प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (7 एप्रिल 2025)
दिल्ली :
22 कॅरेट – 83,000 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – 90,530 प्रति 10 ग्रॅम
मुंबई :
22 कॅरेट – 82,850 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – 90,380 प्रति 10 ग्रॅम
चेन्नई :
22 कॅरेट – 82,850 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – 90,380 प्रति 10 ग्रॅम
advertisement
कोलकाता :
22 कॅरेट – 82,850 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट – 90,380 प्रति 10 ग्रॅम
दरवाढीमागची प्रमुख कारणं
सोन्याच्या दरातील या चढ-उतारामागे अनेक जागतिक कारणं आहेत. चीनने अमेरिकेविरोधात टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे व्यापारी युद्धाची भीती निर्माण झाली आहे. या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला आहे. जिथे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली.
advertisement
त्याचवेळी सोन्याकडे 'सुरक्षित गुंतवणूक' म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अशा अस्थिर काळात गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय केंद्रीय बँकांची खरेदी, भू-राजकीय तणाव, महागाईची चिंता आणि अमेरिकन व्याजदरात संभाव्य कपात हीही महत्त्वाची कारणं आहेत जी सोन्याच्या दरावर परिणाम करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 07, 2025 4:33 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Today: शेअर बाजाराचा ‘क्रॅश’ आणि सोन्याचा ‘बूम’; 24 तासांत एवढं महागलं की सगळं गणित बिघडलं!


