दिल्लीमध्ये अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (AMCHAM) आयोजित ‘टेक्नोलॉजी इंटरवेंशन फॉर रोड सेफ्टी: अमेरिका-भारत भागीदारी’ या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
रस्ते अपघात ही देशासाठी सर्वात मोठी समस्या
गडकरी यांनी यावेळी सांगितले की, रस्ते अपघात ही भारतासाठी अत्यंत गंभीर समस्या आहे. दरवर्षी 4,80,000 अपघात होतात. ज्यामध्ये 1.88 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. विशेषतः 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. या चिंताजनक आकडेवारीबद्दल बोलताना गडकरी यांनी असेही स्पष्ट केले की, दरवर्षी 10,000 मृत्यू 18 वर्षांखालील मुलांचे होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सरकार अधिक कठोर उपाययोजना करणार आहे.
advertisement
अपघातांमुळे GDPचा 3% नुकसान
गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघात हे केवळ वाहतूक समस्या नाही तर ते सार्वजनिक आरोग्याचे गंभीर संकट आहे. त्यामुळे देशाच्या जीडीपीचा 3% भाग दरवर्षी अपघातांमुळे वाया जातो. अपघातांचे एक प्रमुख कारण म्हणजे विडिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) असते. डीपीआर तयार करणारे सल्लागार हे रस्ते अपघातांसाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, असेही गडकरी यांनी नमूद केले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, कधी कधी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने, विविध कारणांमुळे आणि गंभीरतेचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढते.
मदत करणाऱ्यांना सरकारकडून बक्षीस
रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या लोकांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून 25,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. गडकरी यांनी स्पष्ट केले की, जर कोणी अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. तर त्या व्यक्तीच्या उपचारासाठी सरकार जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये किंवा 7 वर्षांपर्यंत वैद्यकीय खर्च देईल.
सरकारचे अपघात रोखण्यासाठी उपाय
गडकरी यांनी सांगितले की, अपघात टाळण्यासाठी सरकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. रस्त्यांची डिझाईन सुधारण्यात येणार असून वाहतुकीसाठी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली लागू केली जाणार आहे. तसेच गतीमर्यादा नियंत्रित करणे, चांगल्या दर्जाचे रस्ते बांधणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हे सरकारचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.