प्रशांत याने 12 वी पर्यंतचे शिक्षण विज्ञान क्षेत्रात घेऊन पुढे ग्रॅज्युएशनसाठी कम्प्युटर सायन्स निवडले. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करण्याऐवजी काही स्पेशल करावे यासाठी पुढे अहमदाबाद, गुजरातमध्ये नवीनच लॉन्च झालेल्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये मास्टर्स करण्याचे ठरवले.
advertisement
मास्टर्समधील पहिले सहा महिने कॉलेज अटेंड केल्यानंतर कोविडमुळे पुढील शिक्षण प्रशांत याला घरून पूर्ण करावे लागले. त्यानंतर पुढे कॅम्पसमधूनच अहमदाबादमधील एका स्टार्ट-अप कंपनीमध्ये इंटर्नशिप आणि फ्रेशर म्हणून जॉब पण मिळाला. जॉबच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये ऑब्जेक्ट डिटेक्शन, ओसीआर इंजिन, कॉम्पुटर व्हिजन, मशीन लर्निंग अशा विविध तंत्रज्ञानावर त्याने काम केले.
दोन वर्षे काम केल्यानंतर प्रशांतने दिल्लीमधील डिफेन्स सेक्टरमधील काम करीत असलेल्या स्टेल्थ कंपनीत जॉब स्विच केला. त्यावेळी त्यांची पोस्ट सीनियर मशीन लर्निंग डेव्हलपर अशी होती. यामध्ये डिफेन्ससाठी उपयोगात पडणारे ऑब्जेक्ट डिटेक्शन, इमेज सेगमेंटेशन, ह्यूमन पोज एस्टिमेशन या सर्व तंत्रज्ञानावर काम केले असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
लहानपणापासून नासा, इसरो, ॲस्ट्रो फिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, ग्रह, तारका पुंज ह्या विषयांमध्ये आवड त्याला होतीच आणि हीच आवड प्रशांतची वेगळ्या रूपाने ज्योतिष शास्त्राकडे वळाली गेली. मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ज्योतिष शास्त्र हे दोन्ही विषय भिन्न जरी असले तरी एकमेकांना पूरक आहेत आणि आताच्या काळात आपण बघतो आहे की chat gpt चा उपयोग ज्योतिष शास्त्रामध्ये पण करता येत आहे. ज्योतिष शास्त्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये साम्य असे की भूतकाळातील माहितीवरून आणि त्यामधील पॅटर्न ओळखून नवीन अंदाज वर्तवणे हे आहे. त्याचबरोबर वडिलांना लहानपणापासून ज्योतिष शास्त्रात काम करत असताना पाहून त्याची आवड आणखीन त्याला या कामात खेचू लागली.
त्यानंतर जॉब करत असतानाच प्रशांतने ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक शिक्षण देखील घेतले आणि नवीन दिल्लीमधील जॉब सोडून आता हा तरुण पूर्ण वेळ ज्योतिष शास्त्रामध्ये देण्याचे ठरवून इतरांची मदत करत असतो. त्याच्या याच आवडीमुळे एकाच वेळी छंद जोपासून मनासारखे काम करून लोकांची सेवा पण करता येत आहे.