मुंबई: गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरातील चढ उतारावर सर्वजण चर्चा करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात चांदीची चर्चा सुरु झाली आहे. आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी चांदी आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार आज सकाळी चांदीची किंमत 1,16,525 प्रति किलो झाली होती. मात्र संध्याकाळी ती 1,15,870 प्रति किलोवर बंद झाली.
advertisement
दरम्यान 24 कॅरेट सोन्याचा दर 396 ने वाढून 1,00,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. काल सोने 1,00,488 वर होते. यापूर्वी 8 ऑगस्ट रोजी सोन्याने 1,01,406 चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
प्रमुख शहरातील (10 ग्रॅम) सोन्याचे भाव
दिल्ली : 24 कॅरेट 1,02,210 | 22 कॅरेट 93,700
मुंबई : 24 कॅरेट 1,02,060 | 22 कॅरेट 93,550
कोलकाता : 24 कॅरेट 1,02,060 | 22 कॅरेट 93,550
चेन्नई : 24 कॅरेट 1,02,060 | 22 कॅरेट 93,550
भोपाल : 24 कॅरेट 1,01,550 | 22 कॅरेट 93,600
सोन्याची या वर्षातील वाढ
या वर्षी म्हणजेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76,162 वरून 24,722 ने वाढून 1,00,884 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर, चांदी 86,017 प्रति किलोवरून 29,853 ने वाढून 1,15,870 वर पोहोचली आहे. 2024 मध्ये सोने 12,810 ने महागले होते.
तज्ञांचे भाकीत
केडिया अॅडव्हायझरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टॅरिफमुळे जागतिक स्तरावर भू-राजकीय तणाव कायम आहे. त्यामुळे सोन्याला आधार मिळत असून मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षात सोने 1,04,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. तर चांदी 1,30,000 प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते.