TRENDING:

Women Success Story: घोंगडी विक्रीतून तब्बल 50 लाखांची उलाढाल, शीतल यांची प्रेरणादायक कहाणी, Video

Last Updated:

पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन आपला व्यवसाय फुलवणाऱ्या जालना जिल्ह्यातील शीतल चाळके या महिलेची कहाणी मोठी प्रेरणादायक आहे.

advertisement
जालना: पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन आपला व्यवसाय फुलवणाऱ्या जालना जिल्ह्यातील शीतल चाळके या महिलेची कहाणी मोठी प्रेरणादायक आहे. धनगर कुटुंबातील असल्याने घोंगडी, मफलर, टोपी आणि लोकरीपासून बनवण्यात येणारे आसन या वस्तू त्यांच्या सासू-सासऱ्यांपासून बनवण्यात येत होत्या. परंतु शासकीय योजनेचा लाभ घेऊन त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि आता वर्षाकाठी तब्बल 50 लाखांची उलाढाल त्या व्यवसायाच्या माध्यमातून करतात. पाहुयात शीतल चाळके यांचीही यशोगाथा.
advertisement

परंपरेने आलेल्या व्यवसायाला व्यावसायिक रूप दिल्यानंतर त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न आपण कमवू शकतो हे शीतल चाळके यांनी सिद्ध करून दाखवले. हातमागावर विणलेली घोंगडीआसनमफलरटोपीशाल इत्यादी वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याच व्यावसायिक बंधूंकडून ते शुद्ध लोकर खरेदी करतात. दिवाळीपासून लोकरीपासून कपडे तयार करण्याचे काम सुरू होते. हातमागावर काम करणारे कलाकार फार कमी उरले आहेत परंतु जे आहेत त्यांच्या सहाय्याने लोकरीपासून बनवण्यात येणारे हे कपडे तयार केले जातात.

advertisement

Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?

बाराशे 50 रुपयांपासून ते सात हजार रुपये किमतीची घोंगडी चाळके कुटुंबाकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मुंबईपुणेसंभाजीनगरनागपूरनाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये या घोंगड्यांना मोठी मागणी आहे. घोंगडी वापरण्याचे आपल्या शरीराला देखील असंख्य फायदे असतात. यामुळे मोठ्या शहरातील नागरिक आवर्जून घोंगडी आणि लोकरीपासून बनवलेल्या या वस्तूंना आवडीने मागवतात. कुरियरच्या सहाय्याने किंवा पोस्टल सर्व्हिसद्वारे या वस्तू डिलिव्हर केल्या जातात. वर्षाकाठी 40 ते 50 लाखांची आर्थिक उलाढाल होऊन 8 ते 10 लाखांचे निव्वळ उत्पन्न या कुटुंबाच्या हाती राहते.

advertisement

आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. शासकीय योजनेतून कर्ज घेऊन आम्ही याला वाढवला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या घोंगड्याआसनशालगादीउशी असे लोकरीपासून बनवण्यात येणारे सगळे कपडे आमच्याकडे उपलब्ध आहेत. मुंबईपुणेनाशिकसंभाजीनगर सारख्या शहरातून या कपड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे शीतल चाळके यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: घोंगडी विक्रीतून तब्बल 50 लाखांची उलाढाल, शीतल यांची प्रेरणादायक कहाणी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल