Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?

Last Updated:

शेतकरी अर्जुन पोपळे हे मागील 4 वर्षांपासून भेंडीचे उत्पादन घेतात. या भेंडीच्या शेतीतून त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

+
केवळ

केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, छत्रपती संभाजीनगरचा शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा गावातील शेतकरी अर्जुन पोपळे हे मागील 4 वर्षांपासून भेंडीचे उत्पादन घेतात. या भेंडीच्या शेतीतून त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. भेंडी शेतीसाठी त्यांनी एप्रिलच्या सुरुवातीला अर्धा एकरमध्ये भेंडी बियाण्याची लागवड ठिबक पद्धतीने केलेली आहे. तसेच भेंडीबरोबरच आंतरपीक म्हणून टोमॅटो आणि ॲपल बोराची लागवड केली आहे. भेंडी पिकातून उत्पन्न चांगले मिळावे म्हणून शेणखत आणि रासायनिक खताचा वापर करण्यात येतो, आता दर तिसऱ्या दिवशी भेंडीची काढणी होत असल्याचे अर्जुन पोपळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
भेंडी पिकातून उत्पन्न चांगले मिळावे आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे पिकावर उद्भवणाऱ्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राइड, कोराझन तसेच धुळी रोगासाठी सल्फर औषधाच्या फवारण्या केल्या जातात. भेंडी शेतीसाठी काही वेळा मजुरांची देखील आवश्यकता असते त्यामुळे त्यांच्या साहाय्याने फवारणी, काढणी केली जाते. पोपळे यांच्या अर्धा एकर शेतात जवळपास 9 हजार भेंडीचे झाडे आहेत, सध्या भेंडीला चांगला भाव देखील आहे त्यामुळे भेंडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
advertisement
भेंडी शेतीत आंतरपीक केल्यामुळे भेंडीच्या झाडांमध्ये काही प्रमाणात वाढ देखील झाली आहे. ॲपल बोर, टोमॅटो, भेंडी हे 3 पिके असल्यामुळे सीजननुसार टोमॅटोच्या जागी हिवाळ्यात दोडके, किंवा कारले या पिकाचे देखील उत्पादन घेता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अर्धा किंवा 1 एकर मध्ये भेंडीचे पीक घेतले पाहिजे तसेच भेंडी पीक तीन दिवसांनी उत्पन्न देणारे आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही भेंडीची शेती करावी, असे आवाहन देखील पोपळे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement