मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रगती, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द, इंद्रायणीचं स्टेटस काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कर्जत यार्ड पुनर्रचना व ब्लॉकमुळे ११-१२ ऑक्टोबरला मुंबई-पुणे, सोलापूर मार्गावरील प्रगती, डेक्कन क्वीन, इंद्रायणी, वंदे भारत एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द. प्रवाशांची गैरसोय.
मध्य रेल्वेच्या कर्जत ते नरेळ मार्गादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. कर्जत यार्ड पुनर्रचना, प्री नॉन इंटरलिंकिंग कामासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान मुंबई-पुणे आणि सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. लांब पल्ल्याच्या काही ट्रेन रद्द तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सोलापूर ते मुंबईच्या ट्रेनसाठी पुण्यापर्यंतच थांबवण्यात येणार आहेत.
कर्जतला विशेष ब्लॉक
मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्जत यार्डाच्या पुनर्रचना कामासंदर्भात प्री-नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या सर्व इंटरसिटी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने 11 आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी हा ब्लॉक जाहीर केला आहे. या कारणामुळे मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाच्या गाड्यांच्या सेवेवर थेट परिणाम झाला आहे.
advertisement
कोणत्या ट्रेन रद्द
प्रगती एक्स्प्रेस
डेक्कन क्वीन
इंद्रायणी एक्स्प्रेस
डेक्कन एक्स्प्रेस
इंटर सिटी एक्स्प्रेस
सिंहगड एक्स्प्रेस (रविवारची सेवा रद्द)
इंद्रायणी एक्स्प्रेसचे स्टेटस
प्रगती आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसप्रमाणेच इंद्रायणी एक्स्प्रेसची सेवाही शनिवार (११ ऑक्टोबर) आणि रविवार (१२ ऑक्टोबर) या दोन्ही दिवशी रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे मुंबई-पुणे दरम्यानचे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले असून, प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच, मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले असून, काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
advertisement
कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांची मोठी गैरसोय
११ आणि १२ ऑक्टोबरच्या मेगा ब्लॉकमुळे कर्जत येथून नेरळ आणि खोपोलीकडे धावणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच, त्यानंतरही लगेच सोमवारी (१३ ऑक्टोबर) आणि मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी ११.२० ते दुपारी ०२.२० पर्यंत पुन्हा तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे सणासुदीपूर्वीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होणार आहेत. ब्लॉकदरम्यान कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली या दोन्ही विभागातील लोकल सेवा पूर्णपणे थांबतील. मात्र, नेरळ ते CSMT (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) या दरम्यान लोकल सेवा सुरू राहील.
advertisement
सोलापूर-मुंबई लांब पल्ल्याच्या गाड्यांवर थेट परिणाम
कर्जत येथे सुरू असलेल्या कामांचा मोठा फटका दक्षिण भारताकडून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे. विशेषतः सोलापूर मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे:
वंदे भारत एक्स्प्रेस रद्द: १२ ऑक्टोबर २०२५ रोजीची मुंबई–सोलापूर–मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही दोन्ही दिशांची सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
advertisement
सिद्धेश्वर एक्स्प्रेस रद्द: सोलापूर–मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही गाडी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईपर्यंत न जाता फक्त पुण्यापर्यंतच धावणार आहे, ज्यामुळे मुंबईपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुण्यातच उतरावे लागेल.
मेगा ब्लॉकमधील लोकलच्या वेळा आणि स्थिती
या मेगा ट्रॅफिक ब्लॉकमध्ये कर्जत स्थानकावरून सुटणाऱ्या लोकल सेवांच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत, जे प्रवाशांनी नोंद घेणे आवश्यक आहे:
advertisement
११ ऑक्टोबर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल : कर्जत येथून CSMT साठी सकाळी ११:१९ वाजता सुटेल.
१२ ऑक्टोबर ब्लॉकनंतरची पहिली लोकल : कर्जत येथून CSMT साठी संध्याकाळी ०७:४३ वाजता सुटेल.
याव्यतिरिक्त, सोमवार १३ ऑक्टोबर आणि मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी ०२.२० या वेळेत तीन तासांचा ब्लॉक असल्याने, या कालावधीतही कर्जत मार्गावरील सर्व लोकल बंद राहतील. प्रवाशांनी हे वेळापत्रक लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रगती, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द, इंद्रायणीचं स्टेटस काय?