Guess Who : छोट्या गावातला मुलगा, फिल्म इंडस्ट्रीत येताच झाला टॉपचा सिंगर! आज करतोय बॉलिवूडवर राज्य; कोण आहे हा?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Famous Folk Singer : फिल्म इंडस्ट्रीचा मार्ग अजिबात सोपा नाही. कोणाला सर्व काही सहज मिळतं. तर कोणाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. प्रत्येक गोष्ट त्यांना केवळ मेहनतीनेच मिळते. बॉलिवूडच्या टॉपच्या गायकाचं नाव देशातच नव्हे तर परदेशातही गाजतंय.
मामे खान असं या गायकाचं नाव आहे. मामे खान राजस्थानमधील जैसलमेरजवळ असलेल्या सत्तो नावाच्या एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. तो राजस्थानच्या मंगनियार समाजातला आहे. लोकगीते ऐकण्याची आवड त्याला लहानपणापासून आहे. त्याचे वडील उस्ताद राणा खान हे देखील एक नामांकित राजस्थानी लोकगायक होते.
advertisement
मामे खान याला 14 व्या वर्षी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने कला आणि संगीतामध्ये पुढे जाण्यासाठी 6 वर्षांची शिष्यवृत्ती दिली होती. मामे खानचं बालपणही फार कष्टात गेलं. लहानपणीच त्याने घराची आर्थिक जबाबदारी समजून घेतली होती. लहानपणी आई-वडिलांसोबत लग्न समारंभांमध्ये जाऊन तो गाणी गात असे.
advertisement
मामेच्या आवाजाने लोकांना लहानपणापासूनच भुरळ घातली होती. 1999 मध्ये तो एका म्युझिकल प्रोग्रामसाठी अमेरिकेला गेला होता. त्या वेळी तो स्टेजवर ढोलक वाजवायचा. पण त्याचं मन ढोलक वाजवण्यापेक्षा गाणं गाण्याकडे वळलं. त्याने वडिलांना सांगितले की ढोलक बेल्जियममध्ये राहिला. वडिलांनी त्याच्या मनातील गोष्ट ओळखली आणि म्हणाले, "आजपासून तू ढोलक नाही, गाणं गाणार."
advertisement
आजच्या काळात लोकगीतांना जपणं खूप अवघड असतं. पण मामे खान यांनी हेच आपलं शस्त्र बनवलं. मुंबईत खूप संघर्ष केला आणि लोकगीतांना नवीन पिढीपर्यंत पोहचवलं. परदेशात लोकगीतांची क्रेझ निर्माण केली.
advertisement
मामे खानची बॉलिवूडमधील एन्ट्री खूपच रंजक होती. एकदा तो इला अरुण यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी झाला होता. त्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा आले होते. जेव्हा संगीतकार शंकर महादेवन यांनी त्याचं गाणं ऐकलं, तेव्हा त्यांनी इलाबाईंना मामेंबद्दल विचारलं. त्यांचं गाणं इतकं भावलं की त्याला लगेच बॉलीवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.
advertisement
मामे खानचा पहिला चित्रपट होता 'लक बाय चान्स'. त्यानंतर त्याने ‘सोन चिडिया’, ‘दसवी’, ‘निकम्मा’, ‘अफवा’, ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘बेबी जॉन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
advertisement
मामे खान राजस्थानचे सर्वात प्रसिद्ध लोकगायक आहेत. त्याच्या प्रसिद्ध लोकगीतांमध्ये ‘चौधरी’, ‘बावो रे बावो’, ‘केसरिया बालम’ आणि ‘सावन’ यांचा समावेश आहे. मामे खानने दूरदर्शनपासून ते कोक स्टुडिओ आणि बॉलिवूडपर्यंत अनेक ठिकाणी गाणी गायली आहेत. त्यांचे स्टेज शो आणि एका गाण्याची फी सुद्धा खूप जास्त आहे.