MBA केलं, नोकरी न करता व्यवसायाला प्राधान्य, तरुणाची वर्षाला 5 लाख कमाई

Last Updated:

सध्याच्या घडीला अनेक तरुण शिक्षण घेऊन व्यवसायाकडे वळत आहेत. अर्जुन या व्यवसायातून वर्षाला जवळपास 4 ते 5 लाखांपर्यंतची कमाई करतो.

+
News18

News18

अहिल्यानगर: सध्याच्या घडीला अनेक तरुण शिक्षण घेऊन व्यवसायाकडे वळत आहेत. राहता तालुक्यातील अर्जुन बिडवे या तरुणाने एमबीए करून नोकरी न करता, जो त्यांचा फॅमिली व्यवसाय आहे, तो करण्याचा निर्णय घेतला आणि माधव सलून सुरू केले. 1983 मध्ये त्याच्या वडिलांनी चार बाय सहाच्या दुकानापासून सलूनच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर अर्जुन हा देखील वडिलांना हातभार लावण्यासाठी दुकानात थांबत असे आणि 2010 पासून त्यालाही या क्षेत्रात आवड निर्माण झाली.
नंतर 2012 पासून त्याने सलूनच्या कामाला सुरुवात केलीपण शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आणि त्यात घरच्यांची अपेक्षाही मुलांनी शिक्षण घेऊन मोठी नोकरी करावीत्यामुळे शिक्षणासाठी पुण्याला गेलापुण्यात एमबीएचे शिक्षण घेत असताना या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळाली आणि या क्षेत्रात अधिक आवड वाढत गेली. शिक्षण घेत असतानाच या क्षेत्रातील शिक्षण घेत प्रोफेशनल होत अर्जुन गेला आणि त्याला समजले की एका आर्टिस्टला किती किंमत असते
advertisement
त्यातूनच समजले की आर्टिस्टने काम कसे करावेहे काम एक पूर्णपणे कला आहे. त्यातूनच त्याने ठरवले की या क्षेत्राकडे लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहेतो बदलायला पाहिजेत्यासाठी त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण करून नोकरी न करता या व्यवसायाला नव्याने सुरुवात केली. फॅमिली व्यवसायात वाढ करत त्याने त्यात लेडीज आणि जेन्ट्स हेअर कट, प्रोफेशनल हेअर कट, हेअर ट्रीटमेंट आणि नेल आर्टला सुरुवात केली.
advertisement
त्याचबरोबर 2020 मध्ये त्याला महाराष्ट्रात झालेल्या जेन्ट्स हेअर कट स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास हा वाढत गेलात्याचबरोबर वडिलांचा पाठिंबा होता आणि त्यातूनच त्याने व्यवसायात वाढ करत ठरवले की ज्या सुविधा मोठ्या शहरात मिळतातत्याच आपण आपल्या गावात सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो.
advertisement
या क्षेत्रात आवड असणाऱ्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी 2024 पासून सलून आणि अकॅडमी चालू केलीत्याच्याकडे राहता शहरातीलच नाही तर पुणेनागपूर, अहमदाबाद आणि सुरत या ठिकाणचे विद्यार्थी आहेत. या व्यवसायातून वर्षाला जवळपास 4 ते 5 लाखांपर्यंतची कमाई करतो. या क्षेत्रात काम करत त्याने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/मनी/
MBA केलं, नोकरी न करता व्यवसायाला प्राधान्य, तरुणाची वर्षाला 5 लाख कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement