स्वप्ना यांना मूळतः गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं होतं, पण काही कारणास्तव त्या मार्गाने जाता आलं नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्या अनुभवातून प्रेरणा घेत व्यवसायात उडी घेतली आणि आज त्या महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या राज्यांतून, विशेषतः तामिळनाडू आणि कोलकातामधून पारंपरिक आणि दर्जेदार साड्यांचा संग्रह करून विक्री सुरू केली आहे. त्या स्वतः त्या भागात जाऊन साड्या निवडतात, त्यामुळे त्यांच्याकडे असलेली उत्पादने दर्जेदार असून ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
advertisement
Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याने केली 900 झाडांची लागवड, पालटलं नशीब, वर्षाला लाखात कमाई, Video
स्वप्ना सांगतात की, व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही. या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीचा, सासू-सासऱ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. हे सगळे कायम त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्ना आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकल्या. खचून न जाता, प्रयत्न करत राहिले म्हणूनच माझा ब्रँड उभा राहिला, असे त्या अभिमानाने सांगतात.
स्वप्ना त्रिमुखे यांचे यश हे अनेक महिलांसाठी प्रेरणादायक आहे. त्या म्हणतात, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. स्वावलंबी बनल्यास कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यांच्या यशकथेवरून हेच शिकायला मिळतं की, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा यांच्या जोरावर कोणतीही स्त्री आपलं स्वप्न पूर्ण करू शकते.