TRENDING:

Tata Capital IPO: पैसे लावण्याआधीची सर्वात मोठी अपडेट, सबस्क्रिप्शनपूर्वी तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरे

Last Updated:

Tata Capital IPO News: टाटा कॅपिटलचा 2 अब्ज डॉलर्सचा आयपीओ लवकरच येत आहे. गुंतवणूकदार उत्साहित आहेत. पण ते टाटा टेक्नॉलॉजीजसारखे ब्लॉकबस्टर लिस्टिंग देईल की अपेक्षेनुसार कमी पडेल?

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: टाटा समूहाची नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी (NBFC) टाटा कॅपिटल लवकरच आपला IPO घेऊन येत आहे. विविध रिपोर्ट्सनुसार कंपनी 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात $2 अब्ज (सुमारे १७,२०० कोटी रुपये) चा IPO बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा IPO सुमारे $11 अब्ज च्या मूल्यांकनावर (valuation) लॉन्च केला जाईल. कंपनी 30 सप्टेंबरपर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

हा IPO भारतीय वित्तीय क्षेत्रातला सर्वात मोठा IPO ठरू शकतो. तसेच टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीज नंतर हा अलीकडील वर्षांतील दुसरा IPO असेल.

टाटा कॅपिटल IPO बद्दल 10 महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

advertisement

1. टाटा कॅपिटलचा IPO कधी सुरू होईल?

टाटा कॅपिटलचा IPO 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात बाजारात येईल आणि कंपनी 30 सप्टेंबरपर्यंत सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

2. IPO चा आकार आणि मूल्यांकन (valuation) किती आहे?

advertisement

या IPO चा आकार $2 अब्ज (सुमारे 17,200 कोटी रुपये) असेल आणि कंपनीचे मूल्यांकन सुमारे $11 अब्ज असण्याची अपेक्षा आहे.

3. IPO मध्ये किती शेअर्स विकले जातील?

IPO मध्ये एकूण 47.58 कोटी शेअर्स असतील ज्यात 21 कोटी नवीन इक्विटी शेअर्स आणि 26.58 कोटी शेअर्सची विक्री (OFS-Offer for Sale) केली जाईल.

advertisement

4. कोण किती शेअर्स विकणार?

टाटा सन्स 23 कोटी शेअर्स आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) 3.58 कोटी शेअर्स विकणार आहे. सध्या टाटा सन्सकडे 88.6% आणि IFC कडे 1.8% हिस्सा आहे.

5. IPO मधून मिळालेल्या रकमेचा उपयोग कसा होईल?

IPO मधून मिळालेली रक्कम कंपनीची टियर-1 भांडवल (capital) मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल.

6. टाटा कॅपिटलची आर्थिक स्थिती कशी आहे?

मार्च 2025 पर्यंत कंपनीचे एकूण कर्ज 2.26 लाख कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचा नफा 3,646.6 कोटी रुपये राहिला. जो आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत 10% जास्त आहे.

7. अलीकडील तिमाही कामगिरी कशी आहे?

जून 2025 च्या तिमाहीत कंपनीचा नफा 1,041 कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. एकूण उत्पन्न 6,557 कोटींवरून 7,692 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

8. टाटा कॅपिटल कोणत्या सेवा देते?

2007 मध्ये सुरू झालेल्या टाटा कॅपिटलने 70 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा दिली आहे. कंपनी कर्ज, विमा, क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन आणि खासगी इक्विटी फंड व्यवस्थापनासारख्या सेवा पुरवते.

9. IPO का आणला जात आहे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार वरच्या स्तरातील NBFCs ला सप्टेंबर 2022 मध्ये नोंदणी झाल्यापासून तीन वर्षांच्या आत शेअर बाजारात सूचीबद्ध होणे आवश्यक आहे. टाटा कॅपिटल या नियमाचे पालन करत आहे.

10. IPO चे व्यवस्थापन कोण करत आहे?

या IPO चे व्यवस्थापन अॅक्सिस कॅपिटल, कोटक महिंद्रा कॅपिटल, BNP परिबास, HDFC बँक, HSBC सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, ICICI सिक्युरिटीज, IIFL कॅपिटल सर्व्हिसेस आणि JP मॉर्गन इंडिया या कंपन्या करत आहेत.

मराठी बातम्या/मनी/
Tata Capital IPO: पैसे लावण्याआधीची सर्वात मोठी अपडेट, सबस्क्रिप्शनपूर्वी तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल