डोंबिवली : सध्या व्यवसाय करणं अनेकांना आवडू लागलं आहे. तरुणांमध्ये तर नोकरीपेक्षा व्यवसाय बरा असेच चित्र आहे. डोंबिवली शहरात सुद्धा तीन शेफ मित्रांनी मिळून स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. द हाऊस ऑफ फ्लेवर असे या हॉटेलचे नाव असून इथे फक्त 80 रुपयांपासून सगळ्या फास्टफूड डिशेस सुरू होतात. इथे मिळणारा व्हेज सलाड डोंबिवलीकरांना खूप आवडतो. या व्यवसायातून आता हे तीनही शेफ मित्र महिन्याला लाखोंचा व्यवसाय करतात.
advertisement
सुरज शर्मा, संदीप मौर्या आणि शिवम यादव या तिघांनी मिळून डोंबिवलीतील फडके रोडवर असणाऱ्या द हाऊस ऑफ फ्लेवरला सुरुवात केली. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असल्यापासूनच या तिघांची घट्ट मैत्री होती आणि तेव्हापासूनच यांच्या डोक्यात स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू झाला होता, परंतु कॉलेज संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या वाटेला जातो तसेच या तिघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली. या तिघांनीही डी.वाय. पाटील कॉलेजमधून प्रोफेशनल शेफचा कोर्स केलेला आहे. नोकरी करताना त्या तिघांनाही जाणवले की आपली आवड मात्र शेफ होण्यातच आहे. त्यामुळे सुरजने आपल्या दोन्ही मित्रांना पुन्हा बोलवून घेतले त्यांना मनवले आणि सुरू झाला द हाऊस ऑफ फ्लेवर या हॉटेलचा प्रवास.
व्हेज मोमोजपासून ते चिकन पॉपकॉर्न, फक्त 100 रुपयांपासून फ्रोजन फूड, डोंबिवलीत हे आहे ठिकाण!
मंडळी या द हाऊस ऑफ फ्लेवर मध्ये तुम्हाला हेल्दी सलाडमध्ये 10 हून अधिक प्रकार मिळतील. ज्यात ग्रीक सलाड, वॉटरमेलन फेटा सलाड, बीटरूट विथ कॉर्न सलाड, एक्झॉटिक व्हेजिज हे सगळे प्रकार उपलब्ध आहेत. मिळणारे पास्ता आणि गार्लिक ब्रेड त्यासोबत पिझ्झा आणि बर्गर तर कमाल लागतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 हून अधिक प्रकार मिळतील. फ्रेंच फ्राईजमध्ये सुद्धा आहे की तुम्हाला खूप प्रकार मिळतील. इथे मिळणारी स्पेशल पाव भाजी तर डोंबिवलीकरांची आवडीची झाली आहे. या पावभाजीमध्ये सुद्धा तुम्हाला 10 हून अधिक प्रकार मिळतील. ज्यामध्ये नॉर्मल पावभाजी, खडा पावभाजी, चीज पावभाजी असे सगळे पदार्थ मिळतील. यांची किंमत फक्त 109 रुपयांपासून सुरू होते.
'स्वतःचे हॉटेल कोणाचे हा विचार आमचा कॉलेजपासून होता. परंतु कॉलेज संपल्यानंतर मी या प्लॅनमधून थोडा बॅक आउट झालो आणि हा प्लॅन तिथेच बंद झाला. नोकरी करताना जाणवले की स्वतःचा व्यवसाय असणे किती गरजेचे आहे. आता हळूहळू आमचे हॉटेल डोंबिवलीकरांच्या पसंतीस उतरत आहे. यामधून 1 लाखांपेक्षा अधिक कमाई होत आहे, असं शेफ सुरज शर्मा यांनी सांगितले.