सरकारी बँकेत खातं उघडायचं असेल तर सर्वात सेफ बँक म्हणून SBI बँकेला ओळखलं जातं. त्यामुळे त्या बँकेत खातं उघडू शकता. जर तुम्हाला खासगी बँकेत खातं उघडायचं असेल तर तुम्ही ICICI किंवा HDFC बँकेत उघडू शकता. खासगी बँकांच्या लिस्टमध्ये भारतील सर्वात सुरक्षित आणि सेफ बँकांच्या यादीमध्ये या बँकांचा नंबर येतो. मात्र तुम्हाला बँकेत न जाताही बँक खातं उघडायचं असेल तर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेत अकाउंट उघडू शकता.
advertisement
महिला/मुलींसाठी कोणतं उत्तम?
जर तुम्हाला गृहिणींसाठी खातं उघडायचं असेल तर तुम्ही पंतप्रधान जनधन योजनेतून बँक खातं उघडू शकता. पीएमजेडीवाई योजनेंतर्गत तुम्ही जनधन खातं उघडू शकता. कोणत्याही खासगी किंवा सरकारी बँकेत तुम्ही हे खातं उघडू शकता. यासाठी कोणत्याही मिनिमम बॅलन्सची आवश्यकता नाही. याशिवाय तुम्हाला ATM, डेबिट कार्ड आणि ऑनलाईन बँकिंगची सुविधा देखील मिळते. इतकंच नाही तर जनधन बँक खात्यावर तुम्हाला अपघाताचा विमा देखील मिळतो, याशिवाय जमा रकमेवर व्याज मिळतं. भारतात कुठेही पैसे अगदी सोयीस्कर पद्धतीने पाठवण्याची सुविधा देखील आहे.
नोकरदार महिलांसाठी कोणतं खातं उत्तम?
महिलांसाठी देखील विशेष सेविंक अकाउंट उघडता येतं. यावर महिलांना प्रवास, शॉपिंगसाठी देखील डिस्काउंट मिळतो. महिलांसाठी विशेष डेबिट आणि क्रेडिट कार्ड देखील असतं. यावरील व्याजदर इतर खात्यांच्या तुलनेत जास्त असतं. विम्याचा लाभही दिला जातो. याशिवाय कर्जासाठी देखील त्यांना कमी व्याजदर लावला जातो. महिलांसाठी विशेष योजना दिल्या जातात.
Railway Knowledge: PNR नंबर काय असतो? 10 डिजिटमध्ये लपलंय तुमच्या प्रवासाचं रहस्य
नोकरदार वर्गासाठी कोणतं अकाउंट?
कंपनीने पगारासाठी भलेही तुमच्या नावे कोणत्याही खासगी बँकेत अकाउंट उघडलं असेल ते कितीही फायद्याचं असलं तरीसुद्धा या खात्यासोबत तुमच्याकडे आणखी एक खातं असायला हवं. यासाठी तुम्ही कोणत्याही खासगी किंवा सरकारी बँकेत खातं उघडू शकता. तुमच्या पगारातील 30 टक्के सेविंगची रक्कम तुम्ही या खात्यावर जमा करायची आहे. बँकेची सेवा आणि सर्व्हिस चार्ज याचा विचार करुन तुम्ही कुठे खातं उघडायचं ते ठरवू शकता.
वृद्ध व्यक्तींसाठी कोणती बँक चांगली?
ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक सारख्या काही लघु वित्त बँका चांगले पर्याय असू शकतात. एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर (FD) जास्त व्याजदर देते, तर युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9.10% पर्यंत सर्वाधिक व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना ज्या बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा वेगवेगळ्या योजनांवर चांगलं व्याजदर मिळणार आहे तिथे पाच लाखांपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करता येऊ शकते.
सहकारी बँकेत खातं उघडावे का?
तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार सहकारी बँकेत खाते उघडण्याचा विचार करू शकता. मात्र काहीवेळा सहकारी बँका बुडण्याचा किंवा दिवाळखोरीत निघण्याचा धोका असतो. मग अशावेळी कष्टाने कमवलेले पैसे बुडण्याची भीती असते. सहकारी बँका विशिष्ट समुदायांना किंवा भागांना सेवा देण्यासाठी स्थापन केल्या जातात आणि त्या अनेकदा कमी व्याजदरात कर्ज देतात. याशिवाय एफडी, आरडीवर व्याजदर जास्त देतात. तिथे पैसे ठेवण्याची जोखीम जास्त असते. त्यांचे नियम आणि अटी तसेच ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल माहिती घेऊन स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी.