उद्या शेअर बाजारात काहीतरी ‘मोठं’ घडणार, 1 हजार 728 कोटींचा GST डिमांड ऑर्डर रद्द; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Last Updated:

Stocks To watch : गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांशी संबंधित महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या शेअर बाजारात काही विशिष्ट शेअर्सवर तेजी किंवा घसरण पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांनी या शेअर्सकडे विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

News18
News18
मुंबई : देशातील आर्थिक क्षेत्रात आज मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ICICI Lombard ला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यापासून ते IEX, UCO Bank, Marico, आणि Bank of Baroda यांच्या दमदार तिमाही कामगिरीपर्यंत अनेक कंपन्यांनी सकारात्मक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.
ICICI Lombard ला बॉम्बे हायकोर्टाकडून मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने ICICI Lombard जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरोधात जारी करण्यात आलेल्या 1,728.86 कोटींच्या GST डिमांड ऑर्डरला रद्द केले आहे. न्यायालयाने आदेश दिला आहे की, या प्रकरणाची पुनर्विचारपूर्वक सुनावणी करण्यात यावी आणि GST काउन्सिलच्या निर्णयांनुसार व सर्क्युलरचा विचार केला जावा. कंपनीच्या दृष्टीने हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 0.22% घसरून 2,040 वर बंद झाला.
advertisement
IEX चा जून महिन्यात वीज व्यवहारात 6.5% वाढ
इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार- जून 2025 मध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रेड व्हॉल्युम 10,852 MU झाला असून वार्षिक आधारावर 6.5% वाढ झाली आहे. रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट्स (RECs) मध्येही 636% जबरदस्त वाढ नोंदवली असून 32.32 लाख RECs चा व्यवहार झाला. गुरुवारी शेअर 1.37% वधारून 197.91 वर बंद झाला.
advertisement
UCO बँकेचा एकूण व्यवसाय 5.24 लाख कोटींवर
UCO बँकेने Q1 FY26 मध्ये एकूण व्यवसायात 1.95% तिमाही आणि 13.7% वार्षिक वाढ नोंदवली आहे. कर्जवाटपात (advances) तिमाही 2.3% आणि वार्षिक 16.6% वाढ, एकूण आकडा 2.25 लाख कोटींवर पोहोचला आहे.
Marico ची Q1 मध्ये 20% महसुलात वाढ
Marico Ltd. ने जाहीर केलेल्या तिमाही अपडेटनुसार कंपनीच्या एकत्रित महसुलात सुमारे 20% वाढ झाली आहे. भारतातील वॉल्युम ग्रोथ काही तिमाहीतील सर्वोच्च पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसायातही double-digit growth कायम आहे. गुरुवारी शेअर 0.34% वाढून 714.85 वर बंद झाला.
advertisement
Aegis Logistics चा नवीन LPG टर्मिनल कार्यान्वित
Aegis Logistics Ltd. ने पिपावाव पोर्टवर 48,000 MT क्षमतेचा एलपीजी क्रायोजेनिक टर्मिनल सुरू केला आहे. या टर्मिनलमुळे कंपनीच्या सप्लाय चेन क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. कंपनीचा शेअर गुरुवारी 0.73% वधारून 751 वर बंद झाला.
Punjab & Sind Bank चा एकूण व्यवसाय 2.31 लाख कोटींवर
बँकेच्या Q1 FY26 च्या आकडेवारीनुसार, एकूण व्यवसायात 10.9% वाढ झाली असून तो 2.31 लाख कोटी झाला आहे. एकूण ठेवांमध्ये 8.8% वाढ होऊन 1.31 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत.
advertisement
L&T Finance चा रिटेल व्यवसाय मजबूत
L&T Finance ने Q1 अपडेटमध्ये सांगितले की, कंपनीचा रिटेलाइजेशन रेट 98% पर्यंत पोहोचला आहे. रिटेल डिस्बर्समेंटमध्ये 18% वाढ होऊन तो 17,510 कोटी झाला आहे. रिटेल लोन बुक 18.2% वाढून 99,800 कोटींवर पोहोचला आहे.
Bank of Baroda चा ग्लोबल व्यवसाय 27.43 लाख कोटींवर
Bank of Baroda ने Q1 FY26 मध्ये ग्लोबल व्यवसायात 10.7% वाढ दर्शवली असून तो 27.43 लाख कोटी झाला आहे. त्यात ग्लोबल एडवांसेज 12.6% वाढून 12.07 लाख कोटी आणि डिपॉझिट्स 9.1% वाढून 14.36 लाख कोटींवर गेले आहेत. देशांतर्गत कर्जवाटपात 12.5% वाढ होऊन ते 9.91 लाख कोटींवर, तर डिपॉझिट्स 8.1% वाढून 12.04 लाख कोटींवर पोहोचले आहेत.
मराठी बातम्या/मनी/
उद्या शेअर बाजारात काहीतरी ‘मोठं’ घडणार, 1 हजार 728 कोटींचा GST डिमांड ऑर्डर रद्द; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement