एकाच दिवशी 9,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; नफा वाढवण्यासाठी CEOचा निर्णय, जगप्रसिद्ध कंपनीचा निर्णय
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Layoff News: फार्मा दिग्गज नोवो नॉर्डिस्कने जगभरात तब्बल 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. डेन्मार्कमध्येच जवळपास 5,000 लोक बेरोजगार होणार असल्याने खळबळ उडाली आहे.
कोपनहेगन: सध्या कोणताही क्षेत्र कर्मचारी कपातीच्या धक्क्यातून वाचू शकलेले नाही. टेक सेक्टरला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानंतर आता फार्मा क्षेत्रातही त्याची झळ पोहोचली आहे. डेन्मार्कची प्रसिद्ध फार्मा कंपनी नोवो नॉर्डिस्क (Novo Nordisk) ने बुधवारी सुमारे 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. ही संख्या त्यांच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांच्या 11.5% आहे.
advertisement
नोवो नॉर्डिस्क वजन कमी करणाऱ्या ‘वेगोवी’ (Wegovy) या प्रसिद्ध औषधाचे उत्पादन करते. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की- नोवो नॉर्डिस्क आपल्या संघटनेची रचना सोपी करण्यासाठी, निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आणि मधुमेह व लठ्ठपणा सेगमेंटसाठी संसाधनांचे पुनर्वितरण करण्याच्या उद्देशाने मोठे बदल करणार आहे. याअंतर्गत कंपनी आपल्या 78,400 कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 9,000 कर्मचाऱ्यांना कमी करेल. या काळात डेन्मार्कमध्ये सुमारे 5,000 कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते.
advertisement
नवीन सीईओचे मोठे निर्णय
हे बदल नवीन सीईओ आणि अध्यक्ष माझियार माइक दोस्तदार यांचा पहिला मोठा निर्णय आहे. ज्यांनी गेल्या महिन्यात लार्स फ्रुएरगार्ड जोर्गेनसन यांना हटवल्यानंतर या फार्मा कंपनीची सूत्रे हाती घेतली आहेत.
advertisement
एकेकाळी वजन कमी करण्याच्या औषधांच्या बाजारात वर्चस्व गाजवणारी नोवो नॉर्डिस्क सध्या बाजारातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. विशेषतः अमेरिकेत. यामागे पुरवठा साखळीतील समस्या आणि प्रतिस्पर्धी कंपनी एली लिली तसेच स्वस्त वजन कमी करणाऱ्या औषधांच्या आगमनामुळे वाढलेली स्पर्धा ही कारणे मानली जात आहेत.
advertisement
नवीन सीईओने जुलैमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले होते की- ते तीन प्रमुख प्राधान्यांसह हे पद स्वीकारत आहेत. यामध्ये मधुमेह आणि लठ्ठपणाच्या उपचारात नोवोचे नेतृत्व टिकवणे, उच्च कार्यक्षमतेची संस्कृती (हाय परफॉरमन्स कल्चर) वाढवणे आणि कंपनीच्या खर्चाची रचना (कॉस्ट बेस) पुनर्स्थापित करून कार्यक्षमता वाढवणे यांचा समावेश आहे.
advertisement
नफ्यावर परिणाम
कंपनीने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केल्यामुळे एकरकमी 8 अब्ज डॅनिश क्रोनर (1.26 अब्ज डॉलर) खर्च येईल. कंपनीला आशा आहे की यानंतर नफ्यात 4% ते 10% वाढ होऊ शकते. मात्र हे ऑगस्ट तिमाहीच्या अंदाजित नफ्याच्या 10%-16% पेक्षा कमी आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/मनी/
एकाच दिवशी 9,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; नफा वाढवण्यासाठी CEOचा निर्णय, जगप्रसिद्ध कंपनीचा निर्णय