गोल्ड मार्केटमध्ये एक नवे नाट्य सुरू झाले असून त्याची सुरुवात चीनकडून झाली आहे. चीनच्या या नव्या पावलामुळे जागतिक सोन्या बाजारात चिंता वाढली असून सोन्याच्या किमतींवर याचा नेमका काय परिणाम होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोन्याच्या किंमतींबाबत लोकांची नेहमीच उत्सुकता असते. मात्र यावेळी चीनकडून आलेल्या एका मोठ्या बातमीनं जागतिक सोन्या बाजाराला हादरा दिला आहे. WGC च्या अहवालानुसार जून 2025 मध्ये चीनने 90 टन सोने विकले आणि हे प्रमाण मागील 10 वर्षांच्या सरासरी विक्रीपेक्षा खूपच जास्त आहे.
advertisement
उशीर केला तर पश्चाताप ठरलेला, Share Market मध्ये शेवटची संधी; हा शेअर हातातून...
जून महिन्यात सोनेरी दागिन्यांच्या मागणीत 10 टक्क्यांची घट झाली. कारण सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी खरेदी टाळली आणि नव्या खरेदीपासून मागे हटले.
चीनच्या केंद्रीय बँकेने सलग आठव्या महिन्यात सोने खरेदी केले असून 2025 च्या पहिल्या सहामाहीत त्यांनी 19 टन सोने खरेदी केले आहे. सध्या चीनकडे एकूण 2,299 टन सोने आहे. जुलैमध्ये सोन्याचा वायदा व्यवहार काहीसा मंदावला पण पहिल्या सहामाहीत दररोज सरासरी 534 टनचा व्यवहार झाला, जो मागील सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे.
मे 2025 मध्ये चीनने 89 टन सोने आयात केले. जे एप्रिलपेक्षा 21% आणि मागील वर्षी मे महिन्याच्या तुलनेत 31% ने कमी आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे दागिन्यांची मागणी घटलेली आहे.
मुलांच्या फ्युचर प्लॅनवर धोकादायक इशारा, 69 लाख अन् 1.4 कोटींचं सत्य ऐकून हादराल
सध्या चीनमध्ये सोने फक्त दागिन्यांच्या रूपात न पाहता, एक रणनीतिक गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. ग्राहक आता पारंपरिक ज्वेलरीऐवजी ETFs (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स), गोल्ड बार्स आणि कॉईनमध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. याच कारणामुळे केंद्रीय बँकाही आता सोन्याकडे एक मजबूत गुंतवणूक पर्याय म्हणून पाहत आहेत.
चीनच्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्यामुळे जागतिक मागणीत वाढ झाली आहे. ज्याचा थेट परिणाम भारतातील किमतींवरही होत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. जर किंमती आणखी वाढल्या, तर सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामात सोन्याची विक्री घटू शकते. ज्याचा दागिन्यांचे दुकानदार आणि लघु व्यापाऱ्यांवर परिणाम होईल.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलने इशारा दिला आहे की, अमेरिकी डॉलर आणि बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यास सोन्याच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. जर केंद्रीय बँकांकडून खरेदी कमी झाली आणि किरकोळ गुंतवणुकीची मागणी घसरली तर मध्यम कालावधीत सोन्याच्या किमती घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.