अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोना यांच्यात जुना वाद होता. हा वाद मॉरिसच्या मनात खदखदत होता. तो अभिषेक यांचा बदला घेण्याची संधी पाहतच होता. तीच संधी त्याला मिळाली. गुरूवार 8 फेब्रुवारी, 2024 चा दिवस. ज्या दिवशी आदित्य ठाकरेंचा कल्याण दौरा होता. बहुतेक कार्यकर्ते या दौऱ्यावर गेले होते. अभिषेक घोसाळकर यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकरसुद्धा आदित्य ठाकरेंच्याच या कार्यक्रमात होते.
advertisement
Abhishek Ghosalkar Firing : मॉरिस भाईची दुसरी बाजू समोर, पोलीस रेकॉर्डमधून धक्कादायक माहिती!
इतक्या वर्षांचं वैर असताना मॉरिसने अभिषेक यांना मैत्रीचा हात पुढे केला. त्यानं आपल्यातील वैर संपलं, आपण जनतेच्या कल्याणासाठी एकत्र आलो हे एकत्र फेसबुक लाईव्हवर सांगायचं असं, मॉरिसने अभिषेक यांना सांगितलं. हे फेसबुक लाइव्ह मॉरिसच्याच कार्यालयात झालं.
मॉरिसने जेव्हा अभिषेक यांच्याशी मैत्री केली आणि त्यांना आपल्या कार्यालयात बोलावलं. तेव्हा अभिषेक यांच्या साथीदारांनी त्यांना सावध केलं होतं. अभिषेक यांचे साथीदार मॉरिसवर विश्वास ठेवून त्याच्या कार्यालयात जाऊ नको, असं सांगत होतं. पण अभिषेक यांनी त्यांचं ऐकलं नाहीत. ते मॉरिससोबत त्याच्या कार्यालयात गेले. मॉरिसला फेसबुक लाइव्हचं व्यसन होतं. त्यामुळे फेसबुक लाइव्हवरच त्याने अभिषेक यांची हत्या केली. त्यांच्या मृत्यूचा त्यानं लाइव्ह इव्हेंट केला.
Abhishek Ghosalkar : अटक झालेल्याचा सूड की राजकीय वैर; मॉरिस आणि अभिषेक यांच्यात नेमका कोणता वाद?
अभिषेक घोसाळकर यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. यात ते गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तातडीने उचलून रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसाळकर यांच्या छातीत डाव्या बाजूला आणि जांघेमध्ये गोळी लागली. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.
दोन जण ताब्यात
दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला घटनास्थळी हजर असलेल्या मेहूल पारेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता रोहित शाहु उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
