Abhishek Ghosalkar Firing : मॉरिस भाईची दुसरी बाजू समोर, पोलीस रेकॉर्डमधून धक्कादायक माहिती!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस भाई यानं गोळ्या झाडल्या, या घटनेनं खळबळ उडाली आहे. मॉरिसबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. दरम्यान मॉरीस भाईवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आता समोर आली आहे.
कोण आहे मॉरिस भाई ?
मॉरिस भाई नरोना स्वतःला एक समाजसेवक असल्याचं सांगत होता. कोरोना काळात तो जास्त चर्चेत आला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळं त्यानं अनेकांना मदतीचा हात दिला. त्याने अनेकांना रेशन वाटल्याच्या बातम्या समोर आल्या. काही काळापूर्वीच त्याची अभिषेक घोसाळकर यांच्याशी ओळख झाली होती.
मॉरिस भाईवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीसांरखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पत्रकारांनाही धमकावल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती. एका महिलेची 88 लाखाची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस भाईवर आहे. मॉरिस भाईने महिलेला धमकी दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
advertisement
दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला घटनास्थळी हजर असलेल्या मेहूल पारेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता रोहित शाहु उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
First Published :
February 09, 2024 11:30 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Abhishek Ghosalkar Firing : मॉरिस भाईची दुसरी बाजू समोर, पोलीस रेकॉर्डमधून धक्कादायक माहिती!


