राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेने एकच खळबळ उडाली. दसऱ्याच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे.