पनवेल पोलिसांनी राहुल पाटील यांना अटक केली असून त्यांना पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं राहुल पाटील यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे तसेच राहुल पाटील यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले असल्याचं राहुल पाटील यांचे वकील ऍड वसीम शेख यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील 'या' गावात माणसांसोबत राहतात साप, लहान मुलंही अंगा-खांद्यावर खेळवतात
advertisement
पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीवरुन झालेल्या गोळीबार प्रकरणी राहूल पाटीलला पोलीस कस्टडी सुनावली आहे. 12 तारखेला ओवळा दुंगी गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेवटची लढत ही कल्याण मधील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात सुरू झाली. अंतिम लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला. जिंकलेल्या गटाने आनंदात गुलालाची उधळण केली. मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला.
राहुल पाटील याला राग आल्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला. दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली. त्यात राहुल पाटील यांनी त्याच्या सोबत जमवलेल्या एकाने जवळ असलेल्या पिस्तूल मधून एक राऊंड फायर केला. घटनास्थळी पोलिसांनी तपासली केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं.