मुंबईतील गिरणगावातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा 106 वे वर्ष आहे. 1920 साली या गणपती मंडळाची स्थापना झाली. आगमनाधीश बाप्पा म्हणून या मंडळाची ख्याती आहे. 22 फुटाची ही मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली आहे. परळच्या वर्कशॉपमधून बाप्पाची मूर्ती चिंचपोकळीकडे मार्गस्थ होणार आहे. परळ वर्कशॉप ते चिंचपोकळी हे अंतर पार करण्यास 30 मिनिटांपेक्षा कमी अवधी लागतो. मात्र, आगमन सोहळ्यासाठी भाविकांची जमलेली उत्साही गर्दीमुळे मिरवणुकीली काही तास लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
गणेशोत्सवासाठी आता आठवडाभराचाच अवधी राहिला आहे. मोठ्या गणेशोत्सव मंडळाची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज अनेक मोठ्या मंडळाचे गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात विराजमान होणार आहेत. मागील काही वर्षांपासून आता बाप्पााच्या आगमन सोहळ्यातही मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी लोटू लागली आहे.