जेठमलानी यांनी प्रभू यांना याचिका इंग्रजीत दाखल केल्या का आणि केल्या असलतील तर त्याचा तपशील तुम्हाला मराठीत समजावून सांगितलं गेला आहे का असे प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण सादर केलेले सर्व कागपत्रे आणि पुरावे हे रेकॉर्ड वर असल्याचे सांगत प्रभू यांनी जेठमलानी याना प्रत्युत्तर दिले.
काय झालं सुनावणीत?
advertisement
सुनिल प्रभू- मी सगळ्यांना व्हिप दिला. ज्यांना व्हिप मिळाला त्यांची नावं मी सांगू शकतो. ज्या आमदारांना व्हिप पोचला जे 21 तारखेला माझ्याबरोबर होते. पान क्रमांक 11, 12, 13, 14 मधील सर्व आमदारांना मी व्हिप दिला होता.
शिंदेचे वकील - 20 तारखेच्या रात्री तुम्ही ज्यांना व्हिप दिला, त्यांची पोचपावती लेखी घेतली का?
सुनिल प्रभू- मी ज्यांना प्रत्यक्ष व्हिप दिला त्यांची लेखी पोच आपल्याकडे आहे.
शिंदेचे वकील - मी म्हणतो या कथित पोचपावत्या तुम्ही घेतल्या हे चुकीचे आहे. म्हणूनच तुम्ही त्या जोडल्या नाही.
सुनिल प्रभू - हे खोटे आहे. सेना प्रमुखांनी तुम्हाला बैठक लावायला सांगितलं की व्हिप जारी करायला सांगितलं होते.
सुनिल प्रभू - सेना पक्षप्रमुख यांनी मला सांगितले की तातडीची महत्वाची बैठक लावा आणि सर्व उपस्थित राहणे आवश्यक असल्याने व्हिप जारी करा.
शिंदेचे वकील - सन 2022 मध्ये शिवसेना पक्षाची अशी कार्यपद्धती होती, की ज्याने व्हिप जारी केला त्यांनीही तो स्विकारायचा असतो.
सुनिल प्रभु - हो ही कार्यपद्धती होती. की ज्यांनी व्हिप जारी केला आहे तो ही विधिमंडळाचा सदस्य असल्याने त्यानेही नियमाप्रामणे इतरांसारखा स्विकारायचा असतो.
शिंदेचे वकील - 20 तारखेच्या रात्री तुम्हीही तो व्हिप स्विकारल्याची पोचपावती लिखित दिली का?
सुनिल प्रभू - मी दिलेल्या व्हिपची पोचपावती द्यावीच लागते. व ती मी दिली आहे.
शिंदेचे वकील - तुम्ही स्वतःला व्हिप दिला की इतर कुणी आमदारांनी तुम्हाला व्हिप दिला.
सुनिल प्रभू - व्हिपवर मी सही केल्यानंतर प्रत्यक्ष आमदाराला भेटून व्हिप देण्याचे काम पार्टी ॲाफिसच्या कर्मचारी करतात.
शिंदेचे वकील - तुम्ही व्हिप जारीकर्ता म्हणून सही केली. तो व्हिप स्विकारताना पोचपावती देताना तो कुणी दिला.
सुनिल प्रभू- मी आपल्याला सांगितले की कार्यालयातील जबाबदार कर्मचारी तो व्हिप पोहचवतात. तसा मी सुद्धा ज्या क्रमाचाऱ्याने माझ्यासमोर व्हिप आणला तो मी इतर आमदारांच्या समोर स्विकारून तो स्विकारल्याबाबत मी सही केली.
वाचा - राहुल गांधींशी संबंधित कंपनीवर कारवाई, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाले नेहरूंनी...
आमदार अपात्रतेसंबंधी आता सलग सुनावणी
आजपासून (ता. 22) येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी होणार आहे. रविवारी 3 डिसेंबर रोजीदेखील सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही बाजूकडील आमदारांच्या साक्षी नोंदवण्यात येणार आहे. त्याशिवाय, व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
