शेरखाने कुटुंबाने साकारला तुळजापूर मंदिर देखावा, गणेशोत्सवाचा सुंदर Video
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होणार्या SSC आणि HSC परीक्षेच्या नाव नोंदणीला मुदत वाढ मिळाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत SSC आणि HSC परीक्षेच्या नाव नोंदणीला मुदत वाढ मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म नं 17 भरला नसेल त्यांनी येत्या 15 सप्टेंबरपर्यंत भरावा. पूर्वी 31 ऑगस्टपर्यंत SSC आणि HSC च्या विद्यार्थ्यांना फॉर्म नं 17 भरण्याची मुदत होती. परंतू आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना फॉर्म नं 17 भरण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.
advertisement
शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, सुरू केला नर्सरी व्यवसाय, महिन्याला दीड लाख रुपयांची उलाढाल, Video
फॉर्म नं 17 भरणाऱ्या SSC आणि HSC च्या विद्यार्थ्यांना 1110 रूपये इतके परीक्षा शुल्क भरावा लागणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून राज्य शिक्षण मंडळाने मुदतवाढ केल्याचे कळतंय. फॉर्म नं 17 हा जे विद्यार्थी नियमित शाळेत जाऊ शकत नाही, शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे असे विद्यार्थी भरू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/mr या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली? वाचा सविस्तर
फॉर्म नं 17 चा फॉर्म भरताना विद्यार्थ्याला शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत, ती नसेल तर द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १११० रुपये नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क १०० आणि विलंब शुल्क १०० रुपये भरावे लागणार आहेत. फार्म १७ भरल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.