मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीबद्दल धक्कादाय माहिती समोर आली आहे. तसंच 'माझ्या घरी चार ते पाच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्ती बरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे विरोधातल्या त्या फाईल होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी जे त्यांचा फोन आला, ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे व्यक्ती होते' असा गौप्यस्फोटही दमानियांनी केला.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी राजेंद्र घनवट या माणसामध्ये काही माहिती पत्रकारांसमोर मांडली आहे.
'राजेंद्र घनवट पिक्चर नंबर दोनेश्वरा इंडस्ट्रियल सर्विसेस या कंपनी बद्दल म्हणजे ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्या दोनच डायरेक्टर आहेत एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट पोपटलाल घनवट. हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत. याच्यात आधी धनंजय मुंडे वाल्मीक कराड देखील होते. त्याच कंपनी हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे आज तगायत डायरेक्टर म्हणून तिथे आहेत. एवढेच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल घनवट हे सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते यांनी काय काय केले तर 11 अशा शेतकऱ्यांची माझ्याकडे आता डिटेल्स आहे. तह्या प्रत्येक शेतकऱ्याला छळून छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 कोटींची जमीन होती ती त्यांनी फक्त आठ लाखात व्यवहार केला, असा आरोप दमानियांनी केला.
'एकाची एक कोटीची जमीन होती त्याचा चार लाखात व्यवहार केला आणि जे जे त्यांच्याविरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनवणे आहेत. या सगळ्यांविरुद्ध त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांना गुन्हे दाखल केले. त्यांचा छळ केला म्हणजे आज जर तुम्ही बघाल या ताई तुमच्याशी बोलतील, यांच्यावर यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला याची माहिती त्या देतील. मीरा सोनवणे यांचा त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती घरचे 1997 मध्ये वारले होते. ते 2006 ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असा दाखवलं आणि या जेव्हा त्यांच्या शेतात काम करत होत्या, तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे तिला एक रात्र माझ्याकडे पाठवं, असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांनी त्याला सरळ केलं म्हणून त्यांच्यावर आठ दिवसानंतर 307 चा गुन्हा दाखल केला, असंही दमानियांनी सांगितलं.
'जे जे शेतकरी त्यांच्याविरुद्ध लढायचे त्या सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे नंतर कुठले कुठले तरी गुन्हे 307 चे गुन्हे दाखल केले. मीराताईंच्या तर त्यांच्याबरोबर नऊ लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले आणि एवढेच नाही त्यांच्यापैकी एक माणूस हा एक पीएसआय देखील आहे. या माणसांनी शिवमबद्दल त्यांनी कसे तिथे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट राबवलेत, याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. हेच आपल्याला सांगता की, राजकारण्यांना हाताशी धरून हे बिल्डर्स अशा सगळ्या असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलायची किंमत सुद्धा दिली जात नाही आणि जो त्यांच्याविरुद्ध लढतो त्या सगळ्यांवर गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं जातं की कोणाच्या ताकद उरत नाही की या सगळ्यांना कुठेतरी त्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.
दमानियांचं घनवट यांना चॅलेंज
पोपटलाल घनवट यांना माझा आव्हान आहे, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करायचे. तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केसमधील सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे. तुमचा एक संजय चव्हाण नावाचा संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक माणूस आहे. त्याच्या नावावर सगळ्यांनी घेतल्या जातात आणि तो त्याचा कसा मिसयुज करतो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. एवढंच नाही तर या पोपट घनवट यांच्यावर असंख्य असे एफआयआर आहे. असताना हाच व्यक्ती त्याची बी समरी करून घेतो आणि याचे सगळे डिटेल्स आहेत, तर मी गृह मंत्रालयाला पत्र लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा री ओपन करा अशा मागणी मी करणार आहे, असंही दमानियांनी ठणकावून सांगितलं.
धनंजय मुंडे आणि घनवटचा काय संबंध?
'एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत आर्थिक व्यवहार किती आहेत. या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी मी आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार या दोघांना करते. आताच्या घटकेला मला आव्हान करायचे सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणीही दमानियांनी केली.