शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेक्सो सेंटरमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल खळबळजनक आणि वादग्रस्त दावा केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय याच संदर्भात दसरा मेळावा संपल्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
advertisement
'बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत मी जे वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल मला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाळासाहेबांचं निधन एक दिवसाआधीच झालं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांना एक दिवस का ठेवलं. हे बाळासाहेबांवर उपचार केलं हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते. ते कशासाठी घेतले होते, ते मला कळलं नाही' अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली.
पत्रकारांनी कदम यांना प्रश्न केला की, इतके दिवस मग तुम्ही गप्प का होता ? त्यावर कदम म्हणाले की, 'मला आज वाटलं तर मी बोललो. ही तर फक्त झाकी आहे, अजून बरंच काही बाकी आहे. खूप बाकी आाहे. ज्यावेळी आमच्या मुलांवर उठताय. फक्त त्यालाच टार्गेट केलं जात आहे. त्याच्याच राजीनाम्याची मागणी करत आहे. असं असेल तर तुमच्या व्हीआयपी लोकांचं आम्हाला सांगायला काय अडचण आहे' असं कदम म्हणाले.
पत्रकारांनी बाळासाहेबांची काही संपत्ती होती का? लोणी खाऊन झालं आहे, २०१२ मधली घटना आता का आठवत आहे. अशी टीका विरोधकाकडून केली जात आहे,असं विचारलं असता कदम म्हणाले की, 'पण मला ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यााबद्दल मी बोललो. हे तर काहीच नाही. अजून बरंच काही आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या मागे लागणार आहात ना, तेवढं तुमचं मी उजेडात आणेल. मी मातोश्रीमध्ये ५५ वर्ष काढली आहे, तुम्ही मातोश्रीवरून बॅगा घेऊन निघत होता, अजून खूप बोलायचं आहे' असा इशाराच कदम यांनी दिला.
आता तुम्ही सूड भावनेनं तुम्ही बोलताय का? पत्रकारांनी असंही विचारलं असता, 'सूड भावनेनं तुम्ही बघताय, माझ्या मुलांसाठी, आम्ही इतकी वर्ष शिवसेनेत काढली आहे. शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली नाही' असंही कदम म्हणाले.