TRENDING:

फोटोग्राफरला अजून काय दिसणार? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, भाषणातील संपूर्ण मुद्दे

Last Updated:

विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात ⁠पण आतले सामान दिसत नाही. ⁠तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : "मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. आम्ही तिथे मदतीला पोहोचलो. पण मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे. ⁠विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात ⁠पण आतले सामान दिसत नाही. ⁠तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का? ⁠आमचे फोटो दिसले, जेव्हा तुमचे फोटो लावून आम्ही लोकांना मदत करत होतो तेव्हा नाही काही बोलले. ⁠फोटोग्राफरला अजून काय दिसणार फोटोच दिसणार ना? असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला.  तसंच, '⁠काही लोकं हात हलवत गेले आणि टीका करुन तोंड वाजवत आले. ⁠यांचे दौरे म्हणजे खुर्ची पाहिजेय,  काजू. बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी होती है' असा टोलाही शिंदेंनी लगावला.
News18
News18
advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणातील मुद्दे

- शिवसेनेचा दसरा मेळावा आपण परंपरेनुसार साजरा करतोय

- ⁠पण यावेळेचा दसरा मेळावा फक्त मुंबई आणि ठाण्याचा घ्यायचे ठरवले

- ⁠कारण पुरा मुळे शेतकरी हवालदिल झालाय

- ⁠त्यांना मदत करुन दसरा मेळावा साजरा करा

- ⁠शेतक-यांची मदत करा

- ⁠आज बळीराजा संकटात आहे

- ⁠त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत

advertisement

- ⁠शेती पशू धन घर वाहून गेलय

- ⁠मी डोळ्यांनी पाहिजे त्यांचे दुःख

- ⁠अशावेळेस त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे

- ⁠कारण. बाबासाहेबांनी सांगलीस

- कारण बाबासाहेबांनी सांगितलय ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण

- ⁠जिथे संकट तिथे शिवसैनिक

- ⁠जिथे संकंट तिथे एकनाथ शिंदे धावून गेल्या शिवाय राहणार नाही

advertisement

- ⁠मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण आहे

- ⁠मदतीला धावून जाण्याचे काम शिवसेना करते

- ⁠महापुरा मुळे बळी राजा पुर्ण कोलमडून गेलाय

- ⁠आम्ही त्यांच्या मागे आहोत

- ⁠अटी शर्ती बाजूला ठेवून बळीराजा मदतीचा हात दिला पाहिजे आधार दिला पाहिजे

- ⁠लोकं सांगत होते आम्ही अनेक वर्षात एवढा पाऊस पाहिला नाही

advertisement

- ⁠सगळं उध्वस्त झालंय लोकं सांगत होते

- ⁠त्यामुळे या मेळाव्यात फक्त आजू बाजूच्या लोकांना बोलावले

- ⁠दसरा सण मोठा आहे, आनंदाला नाही तोटा

- ⁠या दस-यावर पुराचे सावट आहे

- ⁠शेतक-यांवर सावट आहे

- ⁠बाळासाहेब असते तर त्यांनी आज पाठ थोपटली असती

- ⁠पाऊस वै-या सारखा कोसळला आहे

- ⁠इथे सर्व नेते आहेत जेव्हा जेव्हा दुष्काळ आला पूर आला त्यांना त्यावेळेस अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू जनावरांना चारा नेण्याचे काम शिवसैनिकांनी केलंय

advertisement

- ⁠तुम्ही धीर सोडू नका टोकाचे पाऊल उचलू नये

- ⁠तुमचे जीव उद्ध्वस्त झाले आहे त्याला उभारी देण्याचे काम हे सरकार करणार

- ⁠मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला त्याचे दुःख माहितीये

- ⁠शेतक-यांना मदत दिवाळीच्या आत दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे

- ⁠तुमची दिवाळी काळी होवू देणार नाही

- ⁠कपड्याची इस्त्री सांभाळणारा आणि वॅनिटी वॅन घेवून सोशल मिडियावर सरकार चालवणारा हा एकनाथ शिंदे नाही

- ⁠बाळासाहेब म्हणायचे संकटात शिवसैनिक लोकांच्या घरात दिसला पाहिजे

- ⁠लोकांना मदत मिळत आहे, मला अनेकांचे फोन आले घरातील गाळ काढला, भांडी दिली अन्न धान्य दिले … आम्ही घरावर तोरण लावले

- ⁠मला या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे

- ⁠विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात

- ⁠पण आतले सामान दिसत नाही

- ⁠तुम्ही एक तरी बिस्किटचा पुडा घेवून गेला का?

- ⁠आमचे फोटो दिसले , जेव्हा तुमचे फोटो लावून आम्ही लोकांना मदत करत होतो तेव्हा नाही काही बोलले,

- ⁠फोटोग्राफरला अजून काय दिसणार फोटोच दिसणार ना

- सर्व सामान पाठवले आहे

- ⁠काही लोकं हात हलवत गेले आणि टीका करुन तोंड वाजवत आले

- ⁠यांचे दौरे म्हणजे खुर्ची पाहिजेय,  काजू. बदाम, पाणी मे उतरे तो सर्दी होती है.

- ⁠तिथल्या मेळाव्यात रॅम वॅाक सुरू आहे

- ⁠मी कॅामन मॅन आहे

- ⁠या एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत घेणारे नाही

- ⁠किती योजना मी केल्या

- ⁠मी मुंबईत टोल मुक्त केले

- ⁠किती तरी काम केले सांगायला गेलो तर दिवस जाईल

- ⁠मी कधी बोललो नाही माझे हात रिकामे आहेत

- ⁠तुमचे शिवसैनिकांचे हे हातच माझे हात आहेत

- ⁠माझे शिवसैनिक माझे ऐश्वर्य आणि संपत्ती आहे

- ⁠पॅापर्टी चा हाव तुम्हाला आहे

- ⁠बाबासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे

- ⁠आम्ही जे दिले त्याचे कोणाला काही बघून दिले नाही

- ⁠महापालिका ओरबडून घेतली ती माया कुठे गेली लंडनला

- ⁠मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही ती योजना मी सुरु केलीये

- ⁠५ कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा लाभ दिला

- ⁠म्हणुन विधानसभा निवडणूकीत लॅंडस्लाईड विजय दिला

- ⁠सर्व निकष बाजूला ठेवून शेतक-यांना मदत दिली जाईल

- ⁠पी एम केअर योजना कोविडसाठी होती

- ⁠तुम्हाला पंतप्रधान मंत्र्यांवर आरोप करण्याचा अधिकार नाही

- ⁠केंद्राने ४६ हजार कोटी दिले होते

- ⁠केंद्राने उस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपये इनकम टॅक्स चे माफ केले

- ⁠गेल्या ७० वर्षांचा इतिहास बघा कॅांग्रेस ने २ लाख कोटी केले

- ⁠तर मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले

- ⁠८ तारखेला मेट्रो तीन चे उद्घाटन करणार

- ⁠जर सरकार महाबिघाडीचे असते तर

- ⁠एअरपोर्ट झाले नसते सर्व ठप्प झाले असते

- ⁠हे प्रगती सरकार आहे स्पीड ब्रेकर सरकार नाही

- कोणावर टिका करताय जे दोन्ही हाताने देतायेत

- ⁠केंद्र सरकारने खुप काही दिले महाराष्ट्राला

- ⁠इट का जवाब पथ्थर से खुन का जवाब खुन से

- ⁠पी चिदंबरम म्हणटले की आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून पाकवर हल्ला केला नाही ही गद्दारी आहे देशद्रोह आहे भेकड पणा आहे

- ⁠मोदीजींनी पाकला धडा शिकवला

- ⁠ॲापरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा पंतप्रधान मोदी आहेत

- ⁠गिधड की खाल पेहेन के कोई शेर नही होता शेर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी है

- ⁠तामिळनाडूमध्ये जी घटना घडली तेथे खासदार श्रीकांत शिंदे गेले ही शिवसेनेची शान आहे

- ⁠सुरत भारतातच आहे, आम्हाला त्यांना बोलवायला काहीच हरकत नाही

- ⁠तुमचे मेळावे पाक मध्ये घ्यायचा होता ना आणि मुनीरला बोलावले पाहिजे होते

- ⁠कारण तुम्ही आमच्या लष्करावर टिका केली संशय घेतला

- ⁠राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले त्यांच्या बाजूला बसता तुम्ही हे देश प्रेम आहे का?

- ⁠त्यामुळे आमच्यावर टिका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही

- ⁠सावरकरांवर टिका करणा-या राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून बसता

- ⁠हिंदुत्व काय टीशर्ट आहे का ?

- ⁠बाळासाहेब ठाकरे असते तर आज उलटा टांगून धुरी दिली असती

- ⁠बाळासाहेब म्हणटले होते माझ्या शिवसेनेची कॅांग्रेस होवू देणार नाही

- ⁠यांनी फक्त खुर्ची साठी सगळे घालवले

- ⁠पक्षातील लोकांना संपवण्यासाठी कट कारस्थान केले

- ⁠हे पक्ष प्रमुख नाही कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत

- महापालिका निवडणूका झाल्या की त्यांची सावली पण त्यांच्यासोबत राहणार नाही, शिवसैनिक तर सोडा

- ⁠निवडणुका आल्या की मुंबई तोडणार मराठी माणूस हे मुद्दे येणार

- ⁠हे पाप कोणी केले

- ⁠मी सांगतो कोणी मायका लाल जरी खाली आला तरी मुंबई वेगळी करू शकणार नाही

- ⁠आता निवडणूक आल्या की मराठी माणूस आठवतो का?

- ⁠मुंबईतील मराठी माणसांकरता आपण रखडलेले प्रकल्प आपण सुरू करतोय

- ⁠मुंबई मुंबई आहे

- ⁠महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन आहे

- ⁠देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय

- ⁠एक ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही

- ⁠बे दाग पंतप्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा सार्थ अभिमान आहे

- ⁠आम्ही दिल्लीला जातो महाराष्ट्राला भरघोस मदत आणण्यासाठी तुमच्या सारखे जनपथ वर मुजरे करायला नाही

- ⁠हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करणार

- ⁠या एकनाथ शिंदेंने गिरणी कामगारांना घरे दिली

- ⁠१ लाख घरे आम्ही देणार

- ⁠RSS वर टीका केली तेच RSS वाले संकटात धावून जातात

- ⁠तुम्ही कसले हिंदूत्व वादी

- ⁠१०० वर्षे RSS ला झाले त्यांना शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो

- ⁠लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण जिंकले आणि आता स्थानिक स्वराज संस्था देखील महायुती जिंकणार

- ⁠महायुतीची सत्ता मुंबईत आली नाही तर २५ वर्षे मुंबई मागे जाईल

- ⁠आपण केलेली कामे लोकां पर्यंत पोहोचवायचे आहे

- ⁠सर्वत्र महायुतीचा भगवा फडकवायचा आहे

- ⁠कोण कोणाशी युती करतोय याची परवा करु नका

- ⁠सर्वांचा हिशोब आमच्याकडे आहे

- ⁠मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम करायचो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय

- ⁠आणि आता तुम्ही एकनाथ शिंदे म्हणून काम करायचे आहे

- ⁠देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिथे टिका केली गेली

- ⁠अरे तुमचा नंबर खालून पहिला होता

- अरे किती फास्ट रंग बदलता

- ⁠आपापसातील वाद विसरा आणि कामाला लागा

- ⁠सर्व शेतकऱ्यांच्या मुलांची ठरलेली लग्ने यांची जबाबदारी शिवसैनिक घेईल

- ⁠आम्ही त्यांना बांधिल आहोत

- ⁠पुढचे वर्षे महत्वाचे आहे हे शिवसेनेचे जन्म शताब्दी वर्ष आहे

- ⁠हे वर्षे शिवसेना जोरदार साजरे करणार

- ⁠निवडणुकीला लागा पण शेतकऱ्यांना मदत देखील करा

मराठी बातम्या/मुंबई/
फोटोग्राफरला अजून काय दिसणार? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, भाषणातील संपूर्ण मुद्दे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल