या पुलाच्या जागी आता एलफिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक आणखी जलद आणि सुरळीत होण्यासाठी मदत होईल. नवीन पुलाच्या बांधकामामुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय होण्याची शक्यता आहे, मात्र भविष्यात त्याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
कोणते मार्ग वाहतुकीसाठी सुरू असतील?
दादर पूर्वेकडून दादर पश्चिमकडे व दादर मार्केटकडे जाणारे वाहन चालक हे टिळक पुलाचावरुन जातील
परेल पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परेलला जायचं असेल तर करी रोड पुलाचा वापर करतील, हे मर्यादीत वेळेसाठी करण्यात आलं आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेतच इथून प्रवास करता येईल.
परेल, भायखळा पूर्व कडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सि-लिंकच्या दिशेने जाणारे हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.
दादर पश्चिमेकडून दादर पूर्वेकडे जायचं असेल तर टिळक ब्रिजचा वापर करतील
प्रभादेवी आणि लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रूग्णालय व के. ई. एम. रुग्णालयासाठी जाणारे करी रोड ब्रिजचा वापर करतील मात्र वेळेची मर्यादा असेल दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत.
कोस्टल रोड आणि सि-लिंकने आणि प्रभादेवी, वरळी कडून परेल, भायखळा पूर्वकडे जाणारे हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.
करी रोड रेल्वे ब्रिज, भारत माता जंक्शनकडून शिंगटे मास्तर चौककडे वाहतूक एक दिशा चालू राहील मात्र वेळ मर्यादीत असेल सकाळी 07:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत.
करी रोड रेल्वे ब्रिज, शिंगटे मास्तर चौक कडून भारत माता जंक्शनकडे वाहतूक एक दिशा चालू राहील. दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत
करी रोड रेल्वे ब्रिज दोन्ही वाहीन्या वाहतूकीसाठी चालू राहतील. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत
सेनापती बापट मार्ग वडाचा नाका ते फितवाला जंक्शन पर्यंत दुहेरी मार्ग चालू राहील.