TRENDING:

Uddhav Thackeray : शिवसैनिक चुकीला माफी देतील पण...; वाकचौरेंच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार

Last Updated:

शिवसेनेचा आवाज दिल्लीचं तख्त हालवल्या शिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी मात्र आता जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 23 ऑगस्ट : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाऊसाहेब मला भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चूक केली, तुमची आणि मातोश्रीची माफी मागतो. मी म्हणलं माझी माफी नाही मागितली तरी चालेल पण मतदारांची माफी मागा.
News18
News18
advertisement

राजकारणात आपण पक्षांतरे पाहिली पण पक्ष संपवण्याचं कटकारस्थान करणारे राजकारणी आणि पक्ष आपण पहिल्यांदा पाहतो आहे. तुम्ही सर्व शिवसैनिक दिलदार आहात. चुकीला माफी देतात पण पापाला माफी नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मातोश्रीवर ठाकरे गटाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली होती. त्यामध्ये  माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना लोकसभेची उमेदवारी ठाकरे गटाकडून दिल्या जाण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं समजते.

advertisement

मोठी बातमी! आघाडी सरकारच्या काळातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरण बंद, CBIचा अहवाल कोर्टाने स्वीकारला

शिवसेनेचा आवाज दिल्लीचं तख्त हालवल्या शिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी मात्र आता जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही. मी आता ज्यावेळी शिर्डीत येईन तेव्हा साईबाबांचे दर्शन तर घेईनच पण सभा ही घेऊ. माझं त्या गद्दारांना आवाहन आहे. निवडणुकीला सामोर जा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारासुद्धा दिला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गजाआडही खुलली कला! कैद्यांनी कारागृहात बसून काढली चित्रं, इथं भरलंय प्रदर्शन
सर्व पहा

भाऊसाहेब वाकचौरे यांनी २००९मध्ये शिवसेनेकडून लढताना वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यानतंर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या वाकचौरे यांना २०१४ च्या लोकसभेला पराभवाचा धक्का बसला होता. तर आता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. २०२४ मध्ये ते ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray : शिवसैनिक चुकीला माफी देतील पण...; वाकचौरेंच्या प्रवेशावेळी ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल