मोठी बातमी! आघाडी सरकारच्या काळातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरण बंद, CBIचा अहवाल कोर्टाने स्वीकारला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नेत्यांचे फोन बेकायदा टॅपिंग केल्याचे प्रकरण बंद करण्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सोपवला होता. हा अहवाल आता न्याालयाने स्वीकारला असून फोन टॅपिंग प्रकरण बंद करण्यात आले आहे.
मुंबई, 23 ऑगस्ट : आघाडी सरकारच्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन बेकायदा टॅपिंग केल्याच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयात सोपवला होता. हा अहवाल आता न्याालयाने स्वीकारला असून फोन टॅपिंग प्रकरण बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्ये जबाब नोंदवण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस 2021मध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पत्रकार परिषद घेत रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा दाखला देत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या पत्रामध्ये त्यांनी कॉल रेकॉर्डिंगचा तपशीलही दिला होता. या पत्रकार परिषदेनंतरच फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी तक्रार दाखल केली होती.
advertisement
बेकायदा फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे उघड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. सीबीआयशिवाय राज्य गुप्तचर विभागानेसुद्धा या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी काही आक्षेप नसल्याचे सांगितले. यानंतरच न्यायालयाने मंगळवारी सीबीआयचा अहवाल स्वीकारत हे प्रकरण बंद केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2023 10:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! आघाडी सरकारच्या काळातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरण बंद, CBIचा अहवाल कोर्टाने स्वीकारला


